RSS : रेशीमबागेतील विजयादशमी सोहळ्यात शंकर महादेवन यांची विशेष उपस्थिती!
Shankar Mahadevan : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्यात शंकर महादेवन यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
RSS Vijayadashmi Utsav 2023 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघायच्या (RSS) विजयादशमी सोहळ्यात (Vijayadashmi Utsav 2023) यंदा प्रसिद्ध गीतकार आणि संगीतकार शंकर महादेवन (Shankar Mahadevan) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 24 ऑक्टोबर रोजी संघाचा विजयादशमी उत्सव रेशीमबाग मैदानावर साजरा केला जाईल. सरसंघचालक डॉ मोहन भागवत (Dr. Mohan Bhagwat) यांचं मार्गदर्शन दरवर्षी विजयादशमी उत्सवात होत असतं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी विजयादशमी उत्सवाचे आयोजन केले जाते. 24 ऑक्टोबर 2024 रोजी नागपूरातील रेशीमबागेत सकाळी 7.40 वाजता विजयादशमी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवात लोकप्रिय गायक शंकर महादेवन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हेदेखील उपस्थित असतील.
राष्ट्रीय स्वयंसेवर संघाच्या सरसंघचालकांच्या भाषणाची देशभरात उत्सुकता
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पारंपारिक विजयादशमी सोहळा 24 ऑक्टोबरला पार पडणार आहे. या सोहळ्यातील सरसंघचालकांच्या भाषणाची देशभरात उत्सुकता आहे. यावर्षी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत कोणतं दिशादर्शन करणार याची उत्सुकता आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी सोहळ्याचे आयोजन नागपुरातील रेशीमगाब मैदानात करण्यात आले आहे. त्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत विविध मुद्द्यांवर भाष्य करणार आहेत. नागपुरात संघाचा विजयादशमी मेळावा दसऱ्याच्या निमित्ताने नागपुरात होणाऱ्या आरएसएसच्या कार्यक्रमाला विजयादशमी उत्सव असं म्हटलं जातं.
संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराच्या समोरील रेशीम बाग मैदानावर हा मेळावा पार पडतो. पहाटे संघाचे स्वयंसेवक शिस्तबद्ध पद्धतीने रेशीमबागपासून पथसंचलन करतात. त्यानंतर स्वयंसेवक रेशीम बाग मैदानावर शारीरिक कवायती आणि कसरतींचे प्रात्यक्षिक करतात. यंदाच्या कार्यक्रमाला शंकर महादेवन प्रमुख पाहुणे असणार आहेत.
शंकर महादेवन यांच्याबद्दल जाणून घ्या... (Shankar Mahadevan Details)
शंकर महादेवन हे लोकप्रिय गायक आणि संगीतकार आहेत. तामिळ, हिंदी आणि मराठी सिनेमांसाठी संगीतदिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलं आहे. तर 'कट्यार काळजात घुसली' या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं आहे.
शंकर महादेवन हे यशस्वी गायक आणि संगीतकारांपैकी एक आहेत. अल्पावधीतच संगीतक्षेत्रात त्यांनी मोठं नाव कमावलं आहे. 'ब्रेथलेस' हा त्यांचा अल्बम चांगलाच गाजला. शंकर यांनी 2013 मध्ये 'मिल्खा' या सिनेमातील 'जिंदा' या गाण्याद्वारे संगीतक्षेत्रात पदार्पण केलं. शंकर यांची सर्वच गाणी सुपरहिट ठरली आहेत. शंकर यांच्या आगामी गाण्यांची चाहत्यांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या