(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rishab Shetty Kantara: कांताराची सेंच्युरी; थिएटरमध्ये पूर्ण केले 100 दिवस, निर्मात्यांची खास पोस्ट
kantara : कांतारा (Kantara) या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं थिएटरमध्ये 100 दिवस पूर्ण केले आहेत. या चित्रपटानं 100 दिवस पूर्ण केल्यानं आता कांताराच्या मेकर्सनं सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.
Rishab Shetty Kantara: कांतारा (Kantara) हा चित्रपट 2022 सालातील सर्वात चर्चेत असणारा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या कथानकाचं तसेच चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जननं थिएटरमध्ये 100 दिवस पूर्ण केले आहेत. गेली 100 दिवस हा चित्रपट चित्रपटगृहात दाखवण्यात येत आहे. या चित्रपटानं 100 दिवस पूर्ण केल्यानं आता कांताराच्या मेकर्सनं सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.
कांतारानं थिएटरमध्ये 100 दिवस पूर्ण केल्यानं होंबले फिल्म्स (Hombale Films) आणि अभिनेता ऋषभ शेट्टी यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी कांतारा चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं. या पोस्टरवर 100 ग्रँड डेज असं लिहिलं आहे. 'हिंदी भाषेतील कांताराने 100 दिवस पूर्ण केले आहेत हे सांगताना आम्हाला आनंद होत आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.' असं कॅप्शन त्यांनी पोस्टला दिलं आहे.
पाहा पोस्ट:
View this post on Instagram
कन्नड भाषेतील कांतारा हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू या भाषांमध्ये देखील रिलीज करण्यात आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटानं जवळपास 400 कोटींची कमाई केली. 'कांतारा चित्रपटामध्ये ऋषभ शेट्टीसोबतच अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. 'कांतारा' हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. माणूस आणि निसर्ग यांच्या नातेसंबंधावर अधारित असणाऱ्या या चित्रपटानं 2022 मधील भारतातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटाच्या यादीत स्थान मिळवलं. धनुष, अनुष्का शेट्टी, प्रभास ,विवेक अग्निहोत्री,कंगना रनौत या सेलिब्रिटींनी या चित्रपटाचं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कौतुक केलं.
एका मुलाखतीमध्ये ऋषभ शेट्टीनं कांताराला मिळालेल्या यशाबद्दल आपले मत मांडले होते. तो म्हणाला की, 'हे सर्व यश मिळवण्यासाठी 18 वर्षे मेहनत केली आहे आणि हे एका रात्रीत घडलेले नाही. मी फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी काम केलेले नाही. मल्याळम, तेलगू आणि इतर देशांतील सर्व भाषांमधील प्रेक्षकांचा मी आभारी आहे.'
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: