एक्स्प्लोर

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईची कॅन्सरशी झुंज; सलमान खानकडून मदतीचा हात, अ‍ॅक्ट्रेसने सांगितला 'तो' किस्सा

Sudha Chandran Shares Emotional Story of Salman Khans Support: सुधा चंद्रनने आपल्या आईला झालेल्या कर्करोगाबाबत माहिती दिली. तसेच सलमान खानने केलेल्या मदतीबद्दल सांगितले.

Sudha Chandran on Salman Khan helping during mothers cancer: लोकप्रिय अभिनेत्री सुधा चंद्रन अलिकडेच एका व्हिडिओमुळे चर्चेत आली होती. तिनं आपल्या वैयक्तिक जीवनात बरेच चढउतार पाहिले आहेत. दरम्यान, अलिकडेच तिनं मुलाखतीतून  तिच्या खडतर प्रवासाबाबत भाष्य केलं आहे. तिच्या आईची कर्करोगाशी झुंज सुरू होती. या काळात तिच्या आईच्या मदतीला सलमान खान धावून आला होता.  तिनं आपल्या मुलाखतीतून अभिनेत्याच्या दयाळूपणाचे कौतुक केले. सुधा चंद्रन म्हणाली, 'सलमान खूप दयाळू  व्यक्ती आहे. त्याच्याकडे सोन्याचे ह्रदय आहे', असं अभिनेत्री म्हणाली. सुधा चंद्रनने अलिकडेच सलमान खान कशा पद्धतीने अभिनेत्रीच्या मदतीला धावून गेला, या बाबत तिनं मुलाखतीतून सांगितले.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, एका चित्रपटासाठी मी आणि सलमान खान एकत्र काम करत होतो. त्या काळात आईची देखील तब्येत बिघडली होती.  माझ्या आईला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.  मी माझ्या आईच्या तब्येतीची काळजी घेत होती, तसेच शूटिंग देखील करत होती',  असं अभिनेत्रीनं सांगितलं. 

सुधा चंद्रनने सांगितलं की, 'सलमान खूप चांगले व्यक्ती आहेत. मला आठवतंय की मी त्याच्यासोबत एक चित्रपट करत होते. त्यावेळी माझी आई  हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. त्याला कदाचित हा प्रसंग आठवत नसेल, मी माझ्या स्टाफसोबत जेवण करायला बसले होते.  तेव्हा सलमानचा एक व्यक्ती माझ्याकडे आला आणि म्हणाला, सरांना तुमच्यासोबत बोलायचं आहे. मी हो  म्हणाले आणि सलमानकडे गेले. तेव्हा सलमानने  माझ्या आईच्या तब्येतीबाबत विचारपूस केली. तसेच कोणती मदत हवी आहे का? असे विचारले. मला शॉक बसला. त्याला माझ्या आईला कॅन्सर झाले आहे, हे कसे माहित पडले मला ठाऊक नाही. जर तुम्हाला मदत हवी असेल तर, मला फोन करा, मी तुमच्यासाठी उभा आहे, असं सलमान खान म्हणाला'.

'हे सलमान भाई आहेत.  मी त्याला कधीच विसरणार नाही.   कदाचित सलमान ही गोष्ट विसरला असेल. सलमान खानने आपल्या आयुष्यात बऱ्याच जणांची मदत केली आहे.  कुटुंब आणि मित्र - परिवारामुळे सलमान खान  आज मेगास्टार झाला आहे. त्याच्यावर अनेक जणांचा आशीर्वाद आहे', असंही  अभिनेत्री म्हणाली. 'सलमान खानने आतापर्यंत अनेक जणांना आपल्या मदतीचा हात दिला आहे. त्यानं कधीच मदत केल्याचा दिखावा केलेला नाही.  कलाकार कायम सलमानची स्तुति करतात',  असं अभिनेत्री म्हणाली.

महत्त्वाच्या बातम्या

Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
OTT Webseries: Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch
Netflix वर 6 एपिसोडच्या वेबसीरिजचा धुमाकूळ, रिलीज होताच नं -1 ला ट्रेंडिंग; देशभक्ती जागवणारा जबरदस्त थरार, Must Watch
Prajakta Mali on Pravin tarde: प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?
प्रवीण तरडे अन् प्राजक्ता माळी यांच्यात वाद? 'फुलवंती' चित्रपटाचं शूटिंगही थांबवावं लागलं, नक्की घडलं काय?

व्हिडीओ

Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: कडेगावहून विट्याकडे येताना जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याचा अपघात; स्वागत नाकारून जरांगे थेट रुग्णालयात दाखल
Maharashtra Live blog updates: कडेगावहून विट्याकडे येताना जरांगे पाटलांच्या कार्यकर्त्याचा अपघात; स्वागत नाकारून जरांगे थेट रुग्णालयात दाखल
Embed widget