एक्स्प्लोर
अभिनेत्री रिचा चड्ढाला स्वाईन फ्लूची लागण
अभिनेत्री रिचा चड्ढाला देखील स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.
मुंबई : अभिनेता आमीर खाननंतर आता अभिनेत्री रिचा चड्ढाला देखील स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी रिचा आपला आगामी सिनेमा फुकरे रिर्टन्सच्या प्रमोशनसाठी आली होती. त्यावेळीच तिची प्रकृती बरी नव्हती. पण आता सध्या तिची प्रकृती ठीक असल्याचं समजतं आहे. फुकरे रिर्टन्सच्या ट्रेलर प्रीव्ह्यू वेळी देखील ती मास्का घालून आली होती.
रिचानं इंस्टाग्रामवर मास्क घातलेला एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तिनं असं म्हटलं आहे की, 'मला ब्रेक घ्यायचा नव्हता. पण देवानेच मला ब्रेक दिला.'
सध्या ती बरीच व्यस्त आहे. फुकरे रिर्टन्स आणि इनसाइड एज या दोन सिनेमांच्या शुटींगमध्ये सध्या ती बिझी आहे. 8 डिसेंबर 2017ला फुकरे रिर्टन्स हा सिनेमा रिलीज होणार आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनाही स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यांच्यावर दिल्लीतल्या निवासस्थानी उचपार सुरु आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
राजकारण
बीड
राजकारण
Advertisement