एक्स्प्लोर
रणवीर सिंग आगामी '83' चित्रपटासाठी सज्ज
'83' हा चित्रपट 1983 च्या विश्व चषकावर आधारित असणार आहे. ज्यात रणवीर 1983 च्या विश्व चषकातील कर्णधार अष्टपैलू कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग 'सिंबा' आणि 'गली बॉय' या चित्रपटानंतर त्याचा आगामी चित्रपट '83'च्या तयारीला लागला आहे. '83' हा चित्रपट 1983 च्या विश्वचषकावर आधारित असणार आहे. ज्यात रणवीर 1983 च्या विश्व चषकातील कर्णधार अष्टपैलू कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.
'83' या चित्रपटासंबंधीचा एक फोटो रणवीरने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात तो फलंदाजीचे गुण शिकत आहे. या फोटोमध्ये रणवीरसोबत क्रिकेटपटू बलविंदर सिंह संधू दिसत आहेत. बलविंदर सिंह संधू रणवीरला फलंदाजीचे टीप्स देताना या फोटोमध्ये पहायला मिळत आहेत.
'83' चित्रपटाची 2018च्या सुरुवातीलाच घोषणा करण्यात आली होती. भारताने 1983 साली पहिल्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होत. त्याच घडामोडींवर आधारित हा चित्रपट आहे. विश्वचषकाच्या विजयावर हा पहिलाच चित्रपट असणार आहे. ज्याच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. रणवीरचा नुकताच 'गली बॉय' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्यात रणवीरसोबत आलिया भट्ट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन जोया अख्तरने केलं आहे. तर रणवीर सिंगच्या 'सिंबा' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. सिंबाने 200 कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. आता तो त्याचा आगामी चित्रपट '83' साठी मेहनत घेताना दिसत आहे.View this post on Instagram
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement