(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rangbaaz 3 : ‘रंगबाज’च्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला, अभिनेता विनीत कुमार झळकणार मुख्य भूमिकेत!
Rangbaaz 3 : ‘रंगबाज’ या सीरिजचा आणखी एक सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Rangbaaz 3 : ‘झी 5’ या ओटीटी व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर ‘रंगबाज’ या सीरिजचा आणखी एक सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या जबरदस्त गँगस्टर ड्रामाचा हा तिसरा सीझन असून, आतापर्यंत आलेल्या दोन यशस्वी सीझन्समध्ये गुन्हेगार असलेल्या दोन राजकीय नेत्यांची गोष्ट दाखवण्यात आली होती. सचिन पाठक यांचे दिग्दर्शन आणि सिद्धार्थ मिश्रा यांचे लिखाण असलेली ‘रंगबाज : डर की राजनीती’ ही सीरिज नवदीप सिंह यांच्या मागदर्शनाखाली तयार करण्यात आली असून, 29 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
या सीरिजमध्ये अभिनेता विनीत कुमार सिंह, आकांक्षा सिंह, राजेश तेलंग, गीतांजली कुलकर्णी, प्रशांत नारायणन, विजय मौर्य, सुधन्वा देशपांडे, सोहम मजुमदार आणि अशोक पाठक यांचा समावेश आहे.
काय आहे कथानक?
‘रंगबाज : डर की राजनीती’ ही मालिका विनीत कुमार यांची व्यक्तीरेखा, हरून शाह अली बेग यांच्याभोवती फिरणारी असून, मूळचे गँगस्टर असलेले हरून बेग कालांतराने राजकारणी बनतात. या सीझनमध्ये त्यांचा बिहारमधल्या एका लहानशा खेड्यातून अतिशय सामर्थ्यवान राजकारणी होण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे साहेब त्यांच्यावर असलेल्या अपहरण, खून आणि खंडणी अशाप्रकारच्या 32 गुन्हेगारी खटल्यांमुळे 11 वर्ष तुरुंगवास भोगून बाहेर पडतात. कित्येकांचा लाडका, काहींना अजिबात न आवडणारा, पण सगळ्यांना भीतीदायक वाटणारा हा हरून शाह अली बेग आता आपल्या भागात परततो आणि त्याचं एकच ध्येय असतं. ते म्हणजे, निवडणूक लढायची आणि जिंकायची. आपल्याला जे हवं ते मिळवण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत जाण्याची आणि त्यासाठी हिंसा किंवा खूनखराबा करायचीही त्याची तयारी असते.
‘रंगबाज’ स्वीकारण्याची अनेक कारण!
या भूमिकेबद्दल विनीत कुमार सिंह म्हणाले की, ‘रंगबाज या मालिकेचा भाग होण्याची संधी न स्वीकारणं शक्यच नव्हतं. एक तर मी अजय राय यांच्याबरोबर ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ आणि ‘मुक्काबाज’मध्ये काम केलं होतं आणि ते माझ्यासाठी कायमच भाग्यशाली ठरले आहेत. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कायमच चांगला असतो. दुसरं म्हणजे, मला नवदीप यांच्याबरोबर काम करायचं होतं, कारण त्यांचे सिनेमे मला फार आवडतात. तिसरं म्हणजे, सिद्धार्थ मिश्रा यांनी जबरदस्त कथा व विविध पदर असलेल्या व्यक्तीरेखा लिहिल्या आहेत. माझ्या व्यक्तीरेखेचे सर्वच पैलू कोणत्याही अभिनेत्याला आकर्षित करतील असेच आहेत. आणि शेवटचं म्हणजे, रंगबाजला आजवर प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आहे आणि या फ्रँचाईझीचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. त्यामुळे ही मालिका स्वीकारण्याचा निर्णय माझ्यासाठी खूप सोपा होता आणि ट्रेलर आल्यापासून प्रेक्षकांचा प्रतिसाद जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.’
हेही वाचा :
Phone Bhoot Release Date: ‘फोन भूत’ चित्रपटाची रिलीज डेट बदलली! प्रेक्षकांना आणखी वाट पाहावी लागणार!