Ramayana : रामायणात कैकेयीच्या भूमिकेत दिसणार लारा दत्ता, हनुमान सनी देओल तर कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार 'हा' अभिनेता
Ramayana : 'रामायण' हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
Ramayana : 'रामायण' (Ramayana) हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासंदर्भात प्रत्येक अपडेट जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
रणबीर कपूर (Ranbir Kapoor), साई पल्लवी (Sai Pallavi) आणि यश (Yash) अभिनीत 'रामायण' (Ramayana) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांनी सांभाळली आहे. राम मंदिर प्राण-प्रतिष्ठाप्रमाणे 'रामायण' सिनेमाचीदेखील चर्चा आहे. 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात रामाच्या भूमिकेत रणबीर कपूर तर सीताच्या भूमिकेत साई पल्लवी मुख्य भूमिकेत आहेत. तर रावणच्या भूमिकेत यश दिसत आहे. हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलसोबत (Sunny Deol) निर्मात्यांचं बोलणं सुरू आहे.
पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, 'रामायण' या मालिकेत कैकेयीच्या भूमिकेत लारा दत्ता (Lara Dutta) दिसणार आहे. कैकेयीच्या भूमिकेला लारा दत्ता योग्य न्याय देईल, असे म्हटले जात आहे. लारा दत्तादेखील या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहे.
रामायणात कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार बॉबी देओल?
रणबीर कपूरच्या 'रामायण' या सिनेमाच्या शूटिंगला मार्चमध्ये सुरुवात होणार आहे. सध्या या सिनेमाच्या कास्टिंगचं काम सुरू आहे. कंभकर्णाच्या भूमिकेसाठी बॉबी देओलला (Bobby Deol) विचारणा होत आहे. बॉबी देओल कंभकर्णाची भूमिका साकारणार की नाही हे लवकरच समोर येईल.
हनुमानाच्या भूमिकेत दिसणार सनी देओल?
हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओलला विचारणा झाली आहे. रामायणच्या टीमचं सनी देओलसोबत बोलणं सुरू आहे. अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रणबीर कपूरनेदेखील हनुमानाच्या भूमिकेसाठी सनी देओल योग्य असं म्हणाला आहे.
'रामायण' कधी रिलीज होणार? (Ramayana Release Date)
'रामायण' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमात सनी देओल आणि यशची झलक पाहायला मिळणार आहे. जुलै 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
रणबीरचे आगामी सिनेमे (Ranbir Kapoor Upcoming Movies)
नितेश तिवारी आणि मधु मंतेना यांच्या 'रामायण' या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमासह रणबीरचे अनेक सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत. रणबीरकडे अनेक बिग बजेट सिनेमे आहेत. 'अॅनिमल पार्क' आणि 'ब्रह्मास्त्र 2' या सिनेमातही रणबीर झळकणार आहे. रणबीरला नुकतच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे. रणबीरच्या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या