एक्स्प्लोर

Ranbir Kapoor : 'अ‍ॅनिमल'नंतर रामाच्या भूमिकेत झळकणार रणबीर कपूर! 'रामायण'च्या शूटिंगला होणार सुरुवात

Ramayana Shooting Date Update : रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि यशच्या आगामी 'रामायण' या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे.

Ranbir Kapoor Ramayana Shooting Date Update : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. या बहुचर्चित सिनेमामुळे सध्या तो चर्चेत आहे. 'अॅनिमल' या सिनेमानंतर रणबीर आता 'रामायण'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या सिनेमात तो रामाच्या भूमिकेत दिसणार आहे.

रणबीर कपूरचं (Ranbir Kapoor) नाव काही महिन्यांपूर्वी नितेश तिवारी आणि मधु मंतेना यांच्या आगामी 'रामायण' या सिनेमासोबत जोडलं गेलं आहे. या सिनेमासंदर्भात नव-नवे अपडेट्स समोर येत आहेत. दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) 'रामायण' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच 'केजीएफ' फेम यशदेखील या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहे.

'रामायण'च्या शूटिंगला कधी होणार सुरुवात (Ramayana Shooting Date Update)

नितेश तिवारी आणि मधु मंतेना यांचा आगामी 'रामायण' हा सिनेमा रिलीजआधीपासून खूप चर्चेत आहे. या सिनेमासंदर्भात नव-नवे अपडेट्स समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'रामायण' या सिनेमात रणबीर कपूर आणि साई पल्लवी राम आणि सीताच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच दाक्षिणात्य सुपरस्टार यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

'रामायण' या सिनेमाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. नितेश तिवारी आणि मधु मंतेना 'रामायण' या सिनेमाच्या शूटिंगला 2024 मध्ये सुरुवात करणार आहेत. अद्याप नितेश तिवारी आणि मधु मंतना यांनी 'रामायण' सिनेमाच्या शूटिंगबद्दलची अधिकृत माहिती दिलेली नाही. 

रणबीर कपूर स्टार 'रामायण' या सिनेमात प्रेक्षकांना VFX पाहायला मिळणार आहे. या सिनेमाचं ब्लूप्रिंट तयार आहे. या सिनेमाची स्टोरीलाइन खूपच जबरदस्त आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार यश या सिनेमात रावणाच्या भूमिकेत दिसणार असून सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.

रणबीरचे आगामी सिनेमे (Ranbir Kapoor Upcoming Movies)

नितेश तिवारी आणि मधु मंतेना यांच्या 'रामायण' या सिनेमात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमासह रणबीरचे अनेक सिनेमे पाईपलाईनमध्ये आहेत. रणबीरकडे अनेक बिग बजेट सिनेमे आहेत. 'अॅनिमल पार्क' आणि 'ब्रह्मास्त्र 2' या सिनेमातही रणबीर झळकणार आहे. रणबीरला नुकतच मुंबई विमानतळावर स्पॉट करण्यात आलं आहे. रणबीरच्या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

संबंधित बातम्या

Animal Box Office Collection : रणबीरच्या 'अ‍ॅनिमल'ने पार केला 450 कोटींचा टप्पा; रिलीजच्या 12 व्या दिवशी मात्र कमाईत घसरण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 13 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनचा हमीभाव 4892 अन् दर मिळतोय 4200 रुपये, आमचं सरकार आल्यावर मार्ग काढू, राहुल गांधींचा शेतकऱ्यांना शब्द
राहुल गांधींचा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसोबत संवाद,शेतकरीविरोधी धोरणांवरुन भाजपवर हल्लाबोल
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
Embed widget