एक्स्प्लोर
आक्षेपार्ह टिप्पणीबाबत राखी सावंतचा माफीनामा
मुंबई : 'रामायण'कार वाल्मिकी ऋषींविरोधात केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबाबत अभिनेत्री राखी सावंतने माफी मागितली आहे. मात्र अटक वॉरंट जारी झाल्यानंतर तिने माफी मागितली.
राखी सावंतला पंजाब पोलिसांनी आज मुंबईत अटक केली. लुधियानाच्या न्यायालयाने राखी सावंतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. यानंतर पोलिसांचं एक पथक राखी सावंतला अटक करण्यासाठी लुधियानाहून मुंबईला आलं होतं.
पण अटकेपूर्वीच राखीने फेसबुकवर व्हिडीओ शेअर करुन माफी मागितली होती. व्हिडीओत राखी म्हणते की, "जर वाल्मिकी ऋषींबाबत काहीही चुकीचं बोलले असेन तर मी वाल्मिकी समाजाची क्षमा मागते. मला कोणालाही दुखवायचं नाही. मला कधीही वाईट बोलायचं नव्हतं. जे शाळेत शिकले, तेच मी बोलले. तरीही मी जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफ करा. मी तुम्हा सगळ्यांवर प्रेम करते."
अभिनेत्री राखी सावंतला पंजाब पोलिसांकडून अटक
काय आहे प्रकरण?
मागील वर्षी राखी सावंतने वाल्मिकी ऋषींबद्दल आक्षेपार्ह प्रतिक्रिया दिली होती. या टिप्पणीमुळे वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करत, तिच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. यानंतर लुधियाना न्यायालयाने वारंवार समन्स बजावूनही ती न्यायालयात हजर न राहिल्याने तिच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं होतं.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
भारत
बॉलीवूड
Advertisement