Radhika Apte: राधिका आपटेचा नवा चित्रपट; साकारणार स्पाय एजंटची भूमिका, 'या' ओटीटीवर होणार रिलीज
नुकतेच मिसेस अंडरकव्हर (Mrs Undercover) या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरमधील राधिकाच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
Radhika Apte: प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) ही वेब सीरिज आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. राधिका तिच्या अभिनयानं अनेकांची मनं जिंकते. तिचा चाहता वर्ग मोठा आहे. राधिकाच्या आगामी चित्रपट आणि वेब सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. आता ती लवकरच एका आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. राधिका ही मिसेस अंडरकव्हर या चित्रपटामध्ये एका स्पाय एजंटची भूमिका साकारणार आहे. नुकतेच मिसेस अंडरकव्हर (Mrs Undercover) या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झालं आहे. या पोस्टरमधील राधिकाच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.
अनुश्री मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या मिसेस अंडरकव्हर या चित्रपटामध्ये राधिका दुर्गा नावाच्या एका स्पाय एजंटची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात राधिकासोबतच सुमित व्यास आणि राजेश शर्मा यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. मिसेस अंडरकव्हर चित्रपटाचं पोस्टर झी-5 च्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आलं आहे. तसेच राधिकानं देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन मिसेस अंडरकव्हर चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं. या पोस्टरमध्ये राधिकाच्या हातात बंदूक दिसत आहे. हा पोस्टर रिलीज झाल्यानंतर मिसेस अंडरकव्हर चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
पाहा पोस्टर
View this post on Instagram
झी-5 वर रिलीज होणार चित्रपट
राधिकाचा मिसेस अंडरकव्हर हा चित्रपट झी-5 या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची राधिकाचे चाहते उत्सुकतेने वाट बघत आहेत.
राधिकाचे प्रोजेक्ट्स
राधिका आपटेच्या सेक्रेड गेम्स, घूल आणि ओके कम्प्युटर यांसारख्या वेब सीरिजमधून राधिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. तसेच पॅडमॅन, मोनिका ओ माय डार्लिंग, अंधाधूंद यांसारख्या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. राधिका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. राधिका आपटेने 2012 मध्ये ब्रिटीश वादक आणि संगीतकार बेनेडिक्ट टेलर याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. अभिनेत्रीने तिचं लग्न सुरुवातीला सिक्रेट ठेवलं. मात्र, काही काळानंतर तिने याची जाहीर कबुलीही दिली होती. राधिका चित्रपट आणि वेब सीरिजमधील तिच्या बोल्ड अंदाजामुळे देखील चर्चेत असते.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Radhika Apte : स्वतःच्याच लग्नात पतीसोबत फोटो काढायला विसरली राधिका आपटे, कारण सांगताना म्हणतेय...