एक्स्प्लोर
अभिनेत्याने गुदगुदल्या केल्या, मी थोबाडीत मारली : राधिका
या कार्यक्रमात राधिकाने तिच्यासोबत घडलेला वाईट अनुभव शेअर केला. एका तामीळ सिनेमात काम करत असताना हा प्रसंग घडला होता.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेचा पॅडमॅन चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली. समीक्षक आणि प्रेक्षकांनी सिनेमासह राधिकाच्या अभिनयाचंही कौतुक केलं.
राधिका आपटेने नेहा धुपियाच्या 'बीबीएफ्ज विद वोग' या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमात राधिकाने तिच्यासोबत घडलेला वाईट अनुभव शेअर केला. एका तामीळ सिनेमात काम करत असताना हा प्रसंग घडला होता.
"सेटवर माझा पहिला दिवस होता. पण एका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याने माझ्या पायाला गुदगुदल्या करण्यास सुरुवात केली. मला धक्का बसला. सिनेमाच्या आधी आम्ही कधीच भेटलो नव्हतो. तरीही अभिनेता असा प्रकार कसा काय करु शकतो? आणि मी त्याच वेळी त्याला थोबाडीत मारली," असं राधिकाने सांगितलं.
राधिका सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह असते आणि फोटो-व्हिडीओ शेअर करते. काही दिवसांपूर्वीच बिकिनी घालून समुद्रकिनाऱ्यावर बसलेल्या फोटोमुळे तिला ट्रोल केलं होतं. बीचवर बिकिनी नाही तर साडी नेसणार का, असं उत्तर तिने ट्रोलर्सना दिलं होतं.
बीचवर बिकीनी नाही तर साडी नेसू का? राधिकाचं ट्रोलर्सना उत्तर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement