एक्स्प्लोर

Dhokha Round D Corner Trailer Out : ‘रॉकेट्री’नंतर माधवन पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला! आगामी ‘धोका’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज!

Dhokha Trailer Out : ‘धोका : राऊंड डी कॉर्नर’चा ट्रेलर सस्पेन्सने भरलेला आहे. पुन्हा एकदा माधवन चाहत्यांना आणि प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी देणार आहे.

Dhokha Round D Corner Trailer Out : बॉलिवूड अभिनेता आर माधवन लवकरच 'धोका : राऊंड डी कॉर्नर' (Dhokha Round D Corner Trailer Out) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'च्या (Rocketry : The Nambi Effect) यशानंतर अभिनेता आर माधवन (R Madhavan) त्याचा पुढचा चित्रपट 'धोका’ घेऊन मोठ्या पडद्यावर परतत आहे. नुकताच या चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. 23 सप्टेंबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता आर माधवन, अपारशक्ती खुराना, 'द काश्मीर फाइल्स' फेम दर्शन कुमार आणि अभिनेत्री खुशाली कुमार दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे खुशाली कुमार बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

‘धोका : राऊंड डी कॉर्नर’चा ट्रेलर सस्पेन्सने भरलेला आहे. पुन्हा एकदा माधवन चाहत्यांना आणि प्रेक्षकांना मनोरंजनाची मोठी मेजवानी देणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

पाहा ट्रेलर :

चित्रपटाच्या या ट्रेलरची सुरुवात आर माधवन आणि खुशाली कुमार यांच्यापासून होते. दोघेही एक विवाहित जोडी आहेत. मात्र, जेव्हा अपारशक्ती खुराना प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या आयुष्यात सर्वकाही बदलून जाते. यात अपारशक्ती खुराना खलनायकाच्या मिकेत दिसत आहे. तर, दर्शन कुमार एका पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. ट्विस्ट-टर्न आणि सस्पेन्स ड्रामाने भरलेल्या या चित्रपटातील सर्व पात्रांच्या ग्रे शेड्स यात पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन कुकी गुलाटी यांनी केले आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक आर माधवनला पुन्हा एकदा सस्पेन्स थ्रिलरमध्ये पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.

‘रॉकेट्री’ने गाजवलं मनोरंजन विश्व!

याआधी आर माधवन ब्रीद सीरिजमध्ये अतिशय उत्कंठावर्धक लूकमध्ये दिसला होता. आर माधवनच्या ‘ब्रीद’मधील या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता त्याचा आगामी चित्रपट 'धोका : राऊंड डी कॉर्नर’ पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत. ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘धोका : राऊंड डी कॉर्नर’ 23 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. आर माधवन यापूर्वी ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' हा चित्रपट आर माधवनचा ड्रीम प्रोजेक्ट होता. हा चित्रपट इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट प्रचंड चर्चेत आला होता. तर, प्रदर्शित झाल्यानंतरही या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतले होते.

संबंधित बातम्या

Rocketry OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आर. माधवनचा 'रॉकेट्री' ओटीटीवर होणार रिलीज

Dhokha: Round D Corner :  'धोका: राऊंड डी कॉर्नर' चा जबरदस्त टीझर रिलीज; आर. माधवन, खुशाली कुमार अन् अपारशक्ती खुराणा प्रमुख भूमिकेत

 

महत्त्वाच्या बातम्या

Vivek Agnihotris Operation Sindoor: पाकिस्तानला कशी धूळ चारली? 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठी अपडेट, 'हा' बॉलिवूड स्टार साकारणार मुख्य भूमिका
पाकिस्तानला कशी धूळ चारली? 'ऑपरेशन सिंदूर'बाबत मोठी अपडेट, 'हा' बॉलिवूड स्टार साकारणार मुख्य भूमिका
Gashmeer Mahajani New Look Viral: क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
क्लासी हेअर कट, बिअर्ड... गश्मीर महाजनीचा हँडसम लूक; पण हुडीवरच्या 'त्या' ओळीवर खिळल्या नजरा, काय लिहिलंय? PHOTOs
Mahesh Kothare on Laxmikant Berde: 'पहाटे 3 वाजता फोन आला अन् पायाखालची जमीन...'; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूची बातमी ऐकताच महेश कोठारेंना बसलेला धक्का
'पहाटे 3 वाजता फोन आला अन् पायाखालची जमीन...'; लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूची बातमी ऐकताच महेश कोठारेंना बसलेला धक्का
Singer Home Attack: टायगर श्रॉफनंतर प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर ठो-ठो; पहाटे चारचाकीवर हल्ला, CCTV फुटेजमध्ये सगळंच कैद, गायकाचा संशय कुणावर?
टायगर श्रॉफनंतर प्रसिद्ध गायकाच्या घराबाहेर ठो-ठो; पहाटे चारचाकीवर हल्ला, CCTV फुटेजमध्ये सगळंच कैद, गायकाचा संशय कुणावर?

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
महायुतीचे नेते विशेष विमानाने गोकुळ संचालकांना भेटून गोव्यातून कोल्हापुरात; संचालकांची सुद्धा स्पेशल विमानाने एन्ट्री होणार? नेमक्या कोणत्या सूचना केल्या??
Raviraj Sable Patil : अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
अपक्ष उमेदवार तरी मिळाली मोठी मतं फुटली अन् रीलस्टार रविराज साबळे मराठवाड्यात ठरले जायंट किलर! मराठवाडा पदवीधरच्या निवडणुकीत ट्विस्ट
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 : मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
मी प्रस्थापित गिळलाय, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचा निकाल, रिलस्टार रविराज साबळेंची प्रतिक्रिया, किती मतं?
Pune Sachin Sanap : पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपच्या कौस्तुभ गावडेंचा विजय, शिवसेना पुरस्कृत सचिन सानपांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला एकच खंत...'
Pradeep Purnekar Case: उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
उद्याच्या आंदोलनात एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Sanjay Raut: ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
ठाण्यातले 90 टक्के पोलीस अधिकारी एकनाथ शिंदेंच्या पगारावर जगतात, पोलिसांना याची मोठी किंमत मोजावी लागेल: संजय राऊत
Dattatray Sawant : घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव, शिक्षकांची निवडणूक राजकीय केली, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर रासप उमेदवार दत्तात्रय सावंत आक्रमक
Prajakta Mali Visit Pushkar Rajasthan Brahma Mandir: 'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
'म्हणूनच मी जीन्स घातलीय...', प्राजक्ता माळीनं दिली जगप्रसिद्ध मंदिराला भेट, स्वतःच्या लूकबाबत म्हणाली...
Embed widget