Rocketry OTT Release : सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आर. माधवनचा 'रॉकेट्री' ओटीटीवर होणार रिलीज
Rocketry : आर. माधवनचा 'रॉकेट्री' सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
Rocketry OTT Release : बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेता आर माधवन (R Madhavan) सध्या 'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) या सिनेमामुळे चर्चेत आहे. रिलीजआधीच हा सिनेमा चर्चेत आला होता. 75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये या सिनेमाचा प्रीमिअर झाला होता. या सिनेमाने सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला. आता हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे.
आर माधवनच्या 'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' हा सिनेमा 20 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 40 कोटींची कमाई केली. आता हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. रिलीजच्या 24 दिवसांनंतर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
26 जुलैला येणार अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर
'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' हा सिनेमा 26 जुलैला अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा तामिळ, कन्नड, तेलुगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. सिनेमागृहात हा सिनेमा हिंदी, इंग्रजी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.
'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' सिनेमासाठी आर.माधवनने घेतली विशेष मेहनत
'रॉकेट्री: नांबी इफेक्ट' हा सिनेमा आर माधवनचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा सिनेमा इस्रो शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर भाष्य करणारा आहे. हा सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. या सिनेमासाठी आर. माधवनने विशेष मेहनत घेतली आहे.
संबंधित बातम्या