(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pushpa Box Office : साऊथ सुपरस्टार Allu Arjun चा बॉलिवूड बॉक्स ऑफिसवरही धमाका
Pushpa Box Office : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने बॉलिवूड बॉक्स ऑफिसवरदेखील धमाका केला आहे.
Pushpa Box Office : बॉलिवूड बरोबरच दाक्षिणात्य चित्रपटांना देखील प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळत असते. दाक्षिणात्य चित्रपटातील अॅक्शन सिन्स आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. प्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा 'पुष्पा: द राइज' (Pushpa : The Rise) हा चित्रपट 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉलिवूड बॉक्स ऑफिसवरदेखील धमाका केला आहे.
अल्लूच्या पुष्पा- द राइज चित्रपटानं स्पायडरमँन नो वे होम, सूर्यवंशी, मास्टर आणि वकील साब चित्रपटाला कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे. गेल्या शुक्रवारी अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट देशभरात तीन भाषांमध्ये 1400 स्क्रीनवर प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 71 कोटी रुपयांचा व्यवसाय केला तर केवळ तीन दिवसात 173 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. संपूर्ण देशभरात एकाच वेळी प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा हा पहिलाच चित्रपट आहे.
View this post on Instagram
आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये तर प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे. चंदनाची तस्करी करणाऱ्या पुष्पा राजची ही कथा प्रेक्षकांना प्रचंड आवडली असून आता प्रेक्षकांना याच्या दुसऱ्या भागाची उत्कंठा आहे. 17 डिसेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या पुष्पा या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 50 कोटींची कमाई केली होती. 'पुष्पा: द राइज' हा पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग आहे. 2022 मध्ये या चित्रपटाचा दुसरा पार्ट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे कथानक रेड सँडलवुड स्मगलर्सच्या जीवनावर आधारित आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबतच फहाद फासिलने देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन देवी श्री प्रसाद यांनी केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे.
संबंधित बातम्या
Pushpa Box Office Day 1: अल्लू अर्जुन-रश्मिकाच्या 'पुष्पा'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पहिल्याच दिवशीच कोट्यवधींची कमाई
83 Movie : दिल्लीत '83' सिनेमा करमुक्त, 24 डिसेंबरला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
बॉलीवूड निर्माते पराग संघवींना अटक, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha