Prajaktta Mali: चाहत्याचा प्राजक्ताला सवाल 'लग्न करु की नको?', अभिनेत्री उत्तर देत म्हणाली, 'माझा भरवसा नाही'
नुकताच प्राजक्तानं (Prajaktta Mali) मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केला. प्राजक्ताच्या या फोटोला एका नेटकऱ्यानं हटके कमेंट केली आहे. या कमेंटला प्राजक्तानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Prajaktta Mali: मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते नुकताच प्राजक्तानं मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर केला. या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. प्राजक्ताच्या या फोटोला एका नेटकऱ्यानं हटके कमेंट केली आहे. या कमेंटला प्राजक्तानं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
प्राजक्ताची पोस्ट
हिरवी साडी, हातात हिरव्या बांगड्या, चंद्र कोर अशा लूकमधील फोटो प्राजक्तानं शेअर केला. या फोटोला प्राजक्तानं कॅप्शन दिलं, 'भावाच्या लग्नासाठी हवी तशी नऊवार साडी आणि मराठी दागिन्यांसाठी जंग जंग पछाडलं. साडी शिवलेली नाही, नेसलेली आहे. दागिने थेट कोल्हापूरातून आणलेत. तेव्हा कुठे जाऊन लूक साधला गेला आणि आत्मा सुखावला.'
प्राजक्ताच्या चाहत्याची कमेंट
प्राजक्ताच्या या फोटोला तिच्या चाहत्यानं कमेंट केली, 'करु की नको लग्न मी सांगा'. या कमेंटला प्राजक्तानं रिप्लाय दिला, 'करुन टाका माझा काही भरवसा नाही' प्राजक्ताच्या या रिप्लाय अनेकांचे लक्ष वेधले.
पाहा कमेंट:
View this post on Instagram
प्राजक्ता सध्या तिच्या रानबाझार या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये प्राजक्तानं रत्ना ही भूमिका साकारली आहे. रानबाझार सीरिजमधील प्राजक्ताच्या अभिनयाचं अनेक जण कौतुक करत आहेत. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामधून देखील प्राजक्ता प्रेक्षकांच्या भेटीस येते. तसेच काही महिन्यांपूर्वी लकडाऊन हा प्राजक्ताचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता.
प्राजक्ताबरोबरच या चित्रपटामध्ये अभिनेता अंकुश चौधरीनं देखील प्रमुख भूमिका साकारली होती. जुळून येती रेशिमगाठी या मालिकेमुळे प्राजक्ताला विशेष लोकप्रियता मिळाली.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
PHOTO : ‘यह लाल इश्क़, यह मलाल इश्क़’, मनमोहक हास्य पाहून तुम्हीही पडाल प्राजक्ता माळीच्या प्रेमात!