एक्स्प्लोर

Prajakta Mali : 'राडा राडा'च्या माध्यमातून प्राजक्ता माळी करणार 'बलात्कार संस्कृती'वर भाष्य

Prajakta Mali : प्राजक्ता माळी 'राडा राडा' या टॉक शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Prajakta Mali : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) समाजात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर भाष्य करत असते. लवकरच ती 'राडा राडा' (Rada Rada) या टॉक शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय बलात्कार संस्कृतीविषयी भाष्य करणाऱ्या या टॉक शोची धुरा प्राजक्ता माळी आणि पूर्वा शिंदे सांभाळणार आहे. 

'बलात्कार संस्कृती' ही जगाच्या जवळपास प्रत्येक भागात आणि प्रत्येक समाजात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहे. 'बलात्कार संस्कृती' हे शब्द उच्चरायला विचित्र वाटतील कारण संस्कृती सामान्यत: पवित्र आणि सकारात्मक संदर्भात पाहिली जाते. पण संस्कृती हे केवळ सुंदर, रंगीबेरंगी आणि विविध प्रकारच्या परंपरा आणि चालीरीतींचे नाव नाही. 'बलात्कार संस्कृती' म्हणजे अशी सामाजिक व्यवस्था ज्यामध्ये लोक बलात्काराच्या पीडितेला पाठिंबा देण्याऐवजी कोणत्या ना कोणत्या प्रकारे बलात्कार करणाऱ्याच्या समर्थनार्थ उभे राहतात. बलात्कार संस्कृतीचा संदर्भ आहे ती परंपरा ज्यामध्ये बलात्कारासाठी स्त्रीला जबाबदार धरले जाते. 'बलात्कार संस्कृती' म्हणजे अशी संस्कृती ज्यामध्ये बलात्कार आणि महिलांवरील हिंसाचार या गंभीर गुन्ह्यांऐवजी किरकोळ आणि दैनंदिन घटना म्हणून पाहण्याचा प्रयत्न केला जातो.

अशाच भारतीय बलात्कार संस्कृतीविषयी भाष्य करण्यासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री पूर्वा शिंदे व्हीमास मराठीचा राडा राडा या टॉक शो अंतर्गत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. बलात्कार संस्कृतीला आळा घालण्यासाठी या अभिनेत्रींनी दिलेले सल्ले साऱ्या भारतीयांना नक्कीच मोलाचा संदेश देऊन जातील यांत शंकाच नाही. प्राजक्ता आणि पूर्वा व्हीमास मराठीच्या राडा राडा या शो अंतर्गत प्रेक्षकांना सामाजिक विषय कसा हाताळायचा याचे उत्तम मार्गदर्शन करणार आहेत. व्हीमास मराठीचा राडा राडा हा शो प्रत्येक एपिसोडमध्ये नवीन चालू विषय हाताळणार असून नवनव्या कलाकारांचे, विचारवंताचे मत या प्लॅटफॉर्मवरून प्रेक्षकांना कळणार आहे. 

सत्य परिस्थीती सांगणाऱ्या व्यंगात्मक शोच्या माध्यमातून प्राजक्ता आणि पूर्वाचं एक वेगळंच रूप प्रेक्षकांना सामाजिक विषय हाताळताना पाहणे रंजक ठरणार आहे.

संबंधित बातम्या

Alia Bhatt Pregnant : आलिया लंडनमध्ये करतेय हॉलिवूडच्या सिनेमाचे शूटिंग; लवकरच परतणार भारतात

Ketaki Chitale : केतकी चितळेला तूर्तास दिलासा; विविध गुन्ह्यांत 11 जुलैपर्यंत अटक करणार नाही

Phone Bhoot Teaser : कतरिना कैफच्या 'फोन भूत'चा टीझर आऊट; 15 जुलैला सिनेमा होणार रिलीज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget