Phone Bhoot Teaser : कतरिना कैफच्या 'फोन भूत'चा टीझर आऊट; 15 जुलैला सिनेमा होणार रिलीज
Katrina Kaif Phone Bhoot Teaser : कतरिना कैफ आणि सिद्धांत चतुर्वेदीचा 'फोन भूत' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Katrina Kaif Film Phone Bhoot Teaser Out : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) 9 डिसेंबर 2021 रोजी लग्नबंधनात अडकली आहे. लग्नानंतर कतरिनाचा एकही सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाही. अशातच आता कतरिनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या आगामी 'फोन भूत' (Phone Bhoot) सिनेमाचा टीझर शेअर केला आहे.
कतरिनाने टीझर शेअर करत लिहिले आहे,"लवकरच एक भन्नाट विनोदी सिनेमा घेऊन तुमच्या भेटीला येत आहोत". 'फोन भूत' या सिनेमात कतरिनासह सिद्धांत चतुर्वेदी (Siddhant Chaturvedi) आणि ईशान खट्टरदेखील (Ishaan Khatter) महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती.
View this post on Instagram
'फोन भूत'चा टीझर 22 सेकंदाचा आहे. या टीझरमध्ये सिनेमातील कलाकार, दिग्दर्शक आणि प्रोड्यूसर यांच्यावर भाष्य करण्यात आले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन गुरमीत सिंहने केलं आहे. तर रितेश सिंधवानी आणि फरहान अख्तरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाच्या टीझरमध्ये प्रेक्षकांना एक भीतीदायक दृश्याची झलकदेखील पाहायला मिळेल.
15 जुलैला सिनेमा होणार रिलीज
'फोन भूत' या सिनेमाचे शूटिंग 2020 मध्येच पूर्ण झाले आहे. अद्याप या सिनेमाची कथा समोर आलेली नाही. हा सिनेमा 15 जुलै 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'फोन भूत' व्यतिरिक्त कतरिना सलमान खानच्या 'टायगर 3'मध्येदेखील दिसून येणार आहे. कतरिनाचा 'मेरी क्रिसमस' सिनेमादेखी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कतरिनाचा नुकताच 'सूर्यवंशी' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
संबंधित बातम्या
Jug Jugg Jeeyo Box Office Collection : पहिल्या आठवड्यात 'जुग जुग जियो'ची बॉक्स ऑफिसवर जादू; जाणून घ्या कलेक्शन
Alia Bhatt Pregnancy : आलिया आणि रणबीरकडून चाहत्यांना गूड-न्यूज; सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
