![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Prajakta Gaikwad : 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला पदवी परीक्षेत फर्स्ट क्लास; चाहते म्हणाले,"इंजिनिअर झाल्या येसूबाई"
Prajakta Gaikwad : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने इंजीनियरींग पूर्ण केलं आहे.
![Prajakta Gaikwad : 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला पदवी परीक्षेत फर्स्ट क्लास; चाहते म्हणाले, Prajakta Gaikwad Marathi Actress Swarajya Rakshak Sambhaji fame Prajakta Gaikwad got distinction engineering exam know details Prajakta Gaikwad : 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडला पदवी परीक्षेत फर्स्ट क्लास; चाहते म्हणाले,](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/21/e183ce5e78ad3b71b6d517ea1e28c4261689934650741254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Prajakta Gaikwad : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) सध्या चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajya Rakshak Sambhaji) या मालिकेतील येसूबाईंच्या भूमिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या प्राजक्ताने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आहे. सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना याबद्दल माहिती दिली आहे.
अभिनेत्री म्हणून प्राजक्ताचा प्रवास सुरू होता. पण त्यासोबत ती शिक्षणदेखील पूर्ण करत होती. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. आणि फक्त उत्तीर्णच नाही केली तर फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन मिळवलं आहे. तिने पुण्याच्या सावित्रीबाई फुले युनिव्हर्ससिटीमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत तिने चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
प्राजक्ताची पोस्ट काय आहे? (Prajakta Gaikwad Post)
फोटो शेअर करत प्राजक्ताने लिहिलं आहे,"फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन. कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची परीक्षा उत्तीर्ण. 10 पैकी ग्रेड आहे 8.77. आता अखेर मी इंजिनिअर अभिनेत्री झाले. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहते कमेंट्स करत तिचं अभिनंदन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने आलिशान घर घेतलं आहे.
View this post on Instagram
प्राजक्ता सध्या डॉक्टर अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांच्या 'शिवपुत्र संभाजी' या बहुचर्चित महानाट्यात काम करत आहे. प्राजक्ता लवकरच एका दाक्षिणात्य सिनेमातही झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी हैदराबादमधील शूटिंगदरम्यानचे फोटो तिने शेअर केले होते. 'मुरारबाजी' या ऐतिहासिक सिनेमातही ती दिसणार आहे.
प्राजक्ता गायकवाबद्दल जाणून घ्या... (Who is Prajaka Gaikwad)
प्राजक्या गायकवाड ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'नांदा सौख्य भरे', 'स्वराज्यरक्षक संभाजी' आणि 'आई माझी काळुबाई' अशा लोकप्रिय मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेत प्राजक्ताने साकारलेली येसूबाईंची भूमिका चांगलीच गाजली होती. 'आई माझी काळुबाई' या मालिकेला रामराम केल्याने अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली होती. प्राजक्ता लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र त्यापूर्वीच प्राजक्ताचं आणखी एक स्वप्न पूर्ण झालं आहे. तिने एक नवं घर घेतलं आहे.
संबंधित बातम्या
Prajakta Gaikwad: 'चुलीवरची भाकरी, थालीपीठं....'; अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं शेअर केला खास व्हिडीओ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)