एक्स्प्लोर
प्रभासचं इन्स्टाग्रामवर दमदार पदार्पण, पहिल्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव
प्रभास सध्या त्याचा आगामी 'साहो' या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार आहे.

मुंबई : 'बाहुबली' चित्रपटानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता प्रभासने नुकताच इन्स्टाग्रामवर डेब्यू केला आहे. 'अॅक्टरप्रभास' (actorprabhas) असं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं नाव आहे. इन्स्टाग्राम अकाऊंट सुरु करताच लाखो चाहते त्याला फॉलोही करु लागले आहेत. पण आज प्रभासने आपला पहिला इन्स्टाग्राम फोटो अकाउंटवर शेअर केला आहे. त्याचा हा फोटो 'बाहुबली' सिनेमातील आहे. हातात दोन तलवार पकडलेला हा फोटो आपल्याला त्याच्या बाहुबली सिनेमातील दमदार अभिनयाची आठवण करुन देतो. त्याची पहिली पोस्ट आणि त्याचा प्रोफाईल फोटो हा सारखाच आहे. त्याने या फोटोला कोणतंही कॅप्शन दिलेलं नाही. प्रभासने हा फोटो शेअर करताच लाखो चाहत्यांनी त्यावर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. प्रभासने 14 एप्रिल रोजी इन्स्टाग्रामवर ग्रॅण्ड एन्ट्री घेतली. अकाऊंट सुरु करुन काही दिवसच झाले असले तरी प्रभासच्या फॉलोअर्सचा आकडा आठ लाखांच्या पार गेला आहे. विशेष म्हणजे तो अजून कोणालाही फॉलो करत नाही.
इन्स्टाग्रामवर आतापर्यंत प्रभासचे अनेक फेक अकाऊंट्स होते. पण प्रभासने अधिकृत अकाऊंट सुरु करुन आपल्या चाहत्यांना दिलासा दिला आहे. अवघ्या काही दिवसातच त्याच्या फॉलोअर्सची संख्या जवळपास नऊ लाखांवर पोहोचली आहे. प्रभास सध्या त्याचा आगामी 'साहो' या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर झळकणार आहे. यासोबतच नील नितीन मुकेश आणि एवलिन शर्मा देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 15 ऑगस्ट 2019 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.View this post on Instagram
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
भारत























