एक्स्प्लोर

Piccolo Official Trailer: राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते 'पिकोलो' चा ट्रेलर प्रदर्शित; चित्रपट 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

‘पिकोलो’ (Piccolo) या चित्रपटाचा शानदार ट्रेलर मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

Piccolo Official Trailer: जगण्याच्या रोजच्या संघर्षाशी, त्यांच्या जाणीवांशी साधर्म्य असलेल्या वेगळ्या वळणाच्या चित्रपटांची निर्मीती मराठीत सातत्याने होत आहे. याच पठडीतला ‘पिकोलो’ (Piccolo) हा चित्रपट 26 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा शानदार ट्रेलर मनसे अध्यक्ष मा. राजसाहेब ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते नुकताच प्रदर्शित करण्यात आला.  राजसाहेबांनी  चित्रपटाला  मनापासून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग तसेच मध्यवर्ती भूमिकेतले कलाकार प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार उपस्थित होते.  फोर्टिगो मोशन पिक्चर प्रा.लि प्रस्तुत आणि अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित ‘पिकोलो’ ह संगीतमय चित्रपट असून राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘पिकोलो’ मध्ये ही संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर  मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे ‘पिकोलो’ मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे ‘पिकोलो’ चित्रपटात पहाणं रंजक ठरणार आहे.

पाहा ट्रेलर: 

प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार या दोघांसोबत ‘पिकोलो’ चित्रपटात किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव,  रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे. संगीत आणि ध्वनीरचना आनंद लुंकड यांची असून कलादिग्दर्शनाची जबाबदारी नरेंद्र भगत यांनी सांभाळली आहे. असोशिएट प्रोड्युसर सागर म्हात्रे तर कार्यकारी निर्माते राजू आर के झेंडे आहेत. चित्रपटाचे वितरण फिल्मास्त्र स्टुडिओ करणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Ashwini Kasar (@ashwinikasar18)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Entertainment News Live Updates 14 January : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Vibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटकChanda Te Banda Superfast News : चांदा ते बांदा: सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 18 May 2024Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, किरीट सोमय्यांची टीकाUddhav Thackeray On BJP : भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघांवर बंदी घालू शकते, उद्धव ठाकरेंचा घणाघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Vaghul : प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
प्रख्यात बँकर आणि ICICI चे माजी अध्यक्ष नारायण वाघुल यांचं निधन, 88 व्या वर्षी चेन्नईत घेतला अखेरचा श्वास
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
नाशिकजवळ गोदान एक्सप्रेसच्या डब्ब्याखालून धूर, जीवाच्या आकांतेने प्रवाशांच्या उड्या; गाडी रवाना
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणुकीनंतर अमोल कीर्तिकर भाजपसोबत जातील, 100 टक्के जाणार; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
डॉक्टरच पोटात घ्यायचा अर्भकांचा जीव अन् शेतात पुरायचा मृतदेह; संभाजीनगरातील रॅकेटचा पर्दाफाश!
Girish Mahajan : भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
भाजपने पाठिंबा दिल्याचा शांतीगिरी महाराजांचा दावा; संकटमोचक गिरीश महाजन म्हणाले...
Telly Masala : 'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
'तारक मेहता...'चा सोढी 25 दिवसांनी घरी परतला ते हंसत मेहतांची 'स्कॅम 2010' वादात; जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित महत्त्वाच्या बातम्या
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
लोकसभा निवडणुकीत ब्रँड मोदींसमोर कोणाचं सर्वात मोठं आव्हान? प्रशांत किशोर यांचा खुलासा
Kiara Advani : अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
अभिनेत्री कियारा आडवाणीचा 'Cannes 2024'मध्ये धमाकेदार डेब्यू; थाई-हाई स्लिट गाऊनमध्ये मिसेस मल्होत्राने वेधलं लक्ष
Embed widget