एक्स्प्लोर
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या वाहनांची स्थानिकांकडून तोडफोड
परंतु भरती प्रक्रियेत अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना डावलून बाहेरच्या लोकांना भरती करुन घेतल्याचा आरोप आहे.

पालघर : पालघरमधील तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात जाणाऱ्या वाहनांची स्थानिकांनी तुफान तोडफोड केली आहे. प्रकल्पग्रस्त, भूमीपुत्रांना प्रकल्पातील नोकऱ्यांपासून दूर ठेवल्याच्या संतापातून ही तोडफोड करण्यात आली आहे. तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रकल्प क्रमांक 3 आणि 4 मध्ये शेकडो तरुणांना नोकरीसाठी कॉल आले होते. त्यासाठी हे तरुण तारापूर इथे आले होते. परंतु भरती प्रक्रियेत अधिकाऱ्यांनी प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना डावलून बाहेरच्या लोकांना भरती करुन घेतल्याचा आरोप आहे. याचा निषेध म्हणून शेकडो स्थानिक रस्त्यावर उतरले आणि प्रकल्पात जाणारी वाहनं अडवली. स्थानिकांनी सकाळी सहा वाजल्यापासून प्रकल्पात जाणारी वाहनंही रोखून धरली आहेत. शिवाय बसच्या काचाही फोडल्या. त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलिसही घटनास्थळी पोहोचले आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई























