Oscar Nominations 2022 : 'ऑस्कर नामांकन 2022' होणार आज जाहीर
Oscar Nominations 2022 : आज ऑस्कर नामांकन जाहीर होणार आहेत.
Oscar Nominations 2022 : कोरोनाकाळात अनेक सिनेमे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झाले आहेत. काही सिनेमे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत. तर काही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅंड सायन्स आज ऑस्करसाठी नामांकन मिळणाऱ्या सिनेमांची यादी जाहीर करणार आहे. लॉस एंजेलिसमध्ये ऑस्कर नामांकने जाहीर करण्यात येणार आहे. एलिस रॉस आणि लेस्ली जॉर्डन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत.
'ऑस्कर नामांकन 2022' कुठे पाहता येईल?
'ऑस्कर नामांकन 2022' ऑस्करच्या अधिकृत वेबसाईट पाहता येणार आहेत. Oscar.com आणि Oscar.org या दोन्ही वेबसाईटवर हे नामांकन पाहता येईल. याशिवाय ऑस्करच्या ट्विटर, फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवरदेखील प्रेक्षकांना नामांकन पाहता येणार आहे.
'ऑस्कर नामांकन 2022' टीव्हीवर कसे पहावे?
अनेक सिनेरसिक ऑस्करच्या नामांकनाची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यामुळेच ऑस्कर नामांकन जाहीर होणारा कार्यक्रम प्रेक्षकांना छोट्या पडद्यावरदेखील पाहता येणार आहे. एबीसी या चॅनलवर सिनेरसिक हा कार्यक्रम पाह शकतात.
ऑस्कर नामांकने कधी जाहीर होतील?
ऑस्कर नामांकने आज 8 फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी पावणे सात वाजता जाहीर होणार आहेत.
94 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी 27 जानेवारीपासून मतदान सुरू झाले होते ते 1 फेब्रुवारीपर्यंत चालू होते. त्यानंतर (आज) 8 फेब्रुवारी 2022 रोजी ऑस्कर पुरस्कारां घोषणा होणार आहे.
ऑस्करसाठी एन्ट्री पाठवलेल्या सिनेमांना खरेदी करता येते यूट्यूब चॅनलचे तिकीट
ज्या सिनेमांनी ऑस्करसाठी एन्ट्री पाठवली आहे त्यांना यूट्यूब चॅनलचे तिकीट खरेदी करता येते. 3,72,000 रुपये भरून ऑस्करच्या यूट्यूब चॅनलवर 20 मिनिंटांपर्यंतची चित्रपटातील दृश्ये प्रदर्शित करण्यासाठी तिकीट मिळते. 'जय भीम'च्या निर्मात्यांनी हे तिकीट खरेदी केल्यामुळे सूर्याच्या चाहत्यांना 'जय भीम' सिनेमाची काही दृश्ये यूट्यूबवर पाहता येणार आहेत.
संबंधित बातम्या
Jhund Teaser : 'झुंड'चा टीझर रिलीज; बिग बींच्या लूकनं वेधलं लक्ष
Sonu Sood To Host Rodies : सोनू सूद दक्षिण आफ्रिकेतील 'रोडीज' करणार होस्ट, रणविजयने 18 वर्षांनंतर सोडला शो
Lata Mangeshkar : न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा फोटो
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
