Jhund Teaser : 'झुंड'चा टीझर रिलीज; बिग बींच्या लूकनं वेधलं लक्ष
'झुंड' (Jhund) या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
Jhund Teaser : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असणारा 'झुंड' (Jhund) या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांनी केले आहे. टीझरमधील अमिताभ बच्चन यांच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
टीझरमध्ये अमिताभ बच्चन हे प्रशिक्षकाच्या लूकमध्ये दिसत आहेत. त्यांचा 'अँग्री यंग मॅन' अंदाज या चित्रपटामधून पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, असा अंदाज अनेकांनी टीझर पाहून लावला आहे. टीझरमध्ये अमिताभ यांच्यासोबतच काही लाहान मुलांची टीम देखील दिसत आहेत. ही पूर्ण टीम चार मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नागराज मंजुळे यांनी टीझर शेअर केला आहे.
View this post on Instagram
फुटबॉल प्रशिक्षकाच्या जीवनावर आधारित चित्रपट
झुंड चित्रपटाचे कथानक हे विजय बारसे या फुटबॉल प्रशिक्षकांच्या जीवनावर आधारित असणार आहे, असं म्हणटलं जात आहे. सभोवतालीच्या गरीब वस्तीत राहणाऱ्या मुलांना तयार करून त्यांनी आपली अशी फुटबॉल टीम तयार केली होती. याच कथानकावर ‘झुंड’ हा चित्रपट आधारित असणार आहे. गेल्या वर्षी 18 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता पण नंतर या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली.
संबंधित बातम्या
Rannvijay Singh : 18 वर्षानंतर रणविजय 'रोडीज'मधून 'आऊट'; सांगितलं हे कारण
Jhund : 'झुंड'ची रिलीज डेट ठरली; नागराज मंजुळेकडून पोस्ट शेअर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha