(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lata Mangeshkar : न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअरवर झळकला गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा फोटो
Lata Mangeshkar : न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअरवर गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा फोटो झळकला आहे.
Lata Mangeshkar : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज (6 फेब्रुवारी) सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय गानकोकिळेच्या जाण्याने जागतिक पातळीवरदेखील हळहळ व्यक्त केली जात आहे. न्यू यॉर्क टाइम्स स्क्वेअरवर गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा फोटो झळकला आहे.
रविवारी 43 देशात लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेचे लाईव्ह सुरू होते. याआधी देशातील लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे यांचा फोटो न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर लागला होता. त्यामुळे या दोन्ही गायकांनी आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर आता लता मंगेशकरांचा फोटो न्यू यॉर्क टाइम्सवर झळकला आहे.
भारतरत्नसह विविध पुरस्कारांनी सन्मान
लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांना प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकार तसेच राज्य सरकारकडून दुखवटा जाहीर केला आहे. राज्य सरकारने आज (सोमवार) राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar Last Song : लता मंगेशकर यांचे शेवटचे गाणे ऐकून चाहते भावूक
Lata Mangeshkar : 'आपका साया साथ होगा'; 'अमूल'नं लता दीदींना वाहिली श्रद्धांजली
Lata Mangeshkar : बचपन के दिन भी क्या दिन थे...; लता दीदींच्या आठवणीत रमल्या आशाताई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha