Money Laundering Case : जॅकलीननंतर आता होणार नोरा फतेहीची चौकशी; हजर राहण्याचे ईडीचे आदेश
Money Laundering Case : सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी आता अभिनेत्री नोरा फतेहीची पुन्हा एकदा चौकशी होणार आहे.
Money Laundering Case : बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) अडचणीत वाढ झाली आहे. सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandra Shekhar Case) मनी लॉंड्रिंग प्रकरणी जॅकलीन (Jacqueline Fernandez) नंतर आता नोरा फतेहीची चौकशी होणार आहे.
ईडी नोरा फतेहीची उद्या सुकेश चंद्रशेखर मनी लॉंड्रिंग प्रकरणी चौकशी करणार आहे. नोरा फतेही उद्या सकाळी (15 सप्टेंबर) 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहू शकते. याआधीदेखील नोराची ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी तब्बल सहा तास नोराची चौकशी सुरू होती. त्यावेळी त्यांनी नोराचा जबाबदेखील नोंदवून घेतला होता.
Actor Nora Fatehi has been called tomorrow. Since Pinky Irani is here, we want to interrogate both of them tomorrow. There are certain things that need to be clarified. There's no direct connection b/w Nora & Jacqueline with respect to this case: Ravindra Yadav, Spl CP, Crime/EoW pic.twitter.com/ejTt9GKxaN
— ANI (@ANI) September 14, 2022
मनी लॉंड्रिंग प्रकरण नेमकं काय आहे?
200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या सुकेश चंद्रशेखर सोबत बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं नाव जोडले जात होते. त्यानंतर जॅकलिन आणि सुकेशचा एक फोटोदेखील व्हायरल झाला होता. पण आता याप्रकरणात आणखी काही अभिनेत्रींचा सहभाग असल्याचं समोर आले आहे.
सुकेश चंद्रशेखरने पिंकी इराणीच्या माध्यमातून भूमी पेडणेकर (bhumi Pednekar), सारा अली खान (Sara Ali Khan) आणि जान्हवी कपूर (Jhanvi Kapoor) सारख्या काही अभिनेत्रींवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे ईडीच्या तपासात उघड झालं आहे. सुकेशने या अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू पाठवल्या आहेत. काही अभिनेत्रींनी या भेटवस्तूंचा स्वीकार केला तर काहींनी नाकारल्या होत्या.
अभिनेत्रींना सुकेशने दिल्या महागड्या भेटवस्तू
सुकेश चंद्रशेखरने एकूण पाच जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचं समोर आलं होतं. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख आणि प्रत्येकी नऊ लाख रुपये किंमत असलेल्या एकूण 36 लाखांच्या चार पर्शियन मांजरांचाही समावेश होता. ही सर्व माहिती ईडीनं दाखल केलेल्या आरोपपत्रात देण्यात आली होती. पण आता जॅकलीनसह आणखी काही अभिनेत्रींनादेखील महागड्या भेटवस्तू दिल्याचं समोर आलं आहे.
संबंधित बातम्या