एक्स्प्लोर

Sukesh Chandrashekhar : 7640 कोटींचा कर देतो, भारतात गुंतवणूक करतो, ठग सुकेश चंद्रशेखर याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र?

Sukesh Chandrashekhar : ठग सुकेश चंद्रशेखर यानं एक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना एक कथित पत्र लिहिल्याची माहिती आहे. त्यानं विदेशातील कमाईवर 7640 कोटींचा कर द्यायचा असल्याचं म्हटलंय.

नवी दिल्ली :तिहार तुरुंगात असलेल्या  ठग सुकेश चंद्रशेखरसंदर्भात एक बातमी समोर येत आहे. सुकेश चंद्रशेखरनं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना एक पत्र लिहिलं असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्या कथित पत्रानुसार सुकेश चंद्रशेखरनं त्याची विदेशातील कमाई 22410 कोटी असल्याचं म्हटलंय. त्या कमाईवरील 7640 कोटींचा कर द्यायचा असल्याचं त्यानं म्हटलंय. विदेशातील त्याच्या दोन कंपन्यांमधून 2024-25 या आर्थिक वर्षात 22410 कोटी रुपयांची कमाई केल्याचं सुकेश चंद्रशेखरनं म्हटलंय.  

कोणत्या कंपन्यांतून सुकेशची कमाई

सुकेशनं दावा केल्यानुसार त्याच्या विदेशात दोन कंपन्या आहेत. LS होल्डिंग्ज इंटरनॅशनल (नेवाडा,अमेरिका) आणि स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन (ब्रिटीश वर्जि आयलँडस) या 2016 पासून सुरु आहेत. या दोन्ही कंपन्या ऑनलाईन आणि ऑफलाईन गेमिंग आणि बेटिंग क्षेत्रात काम करतात. सुकेशनं म्हटलं की या कंपन्यांचा कारभार अमेरिका, स्पेन, ब्रिटन, दुबई, हाँगकाँग सारख्या अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. 2024 मध्ये कंपन्यांनी 22410 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

भारतात गुंतवणुकीची इच्छा?  

न्यूज 18 च्या एका रिपोर्टनुसार सुकेश चंद्रशेखरनं त्याच्या पत्रात म्हटलं की त्याला उत्पन्नावर कर देण्यासोबत भारतात तंत्रज्ञान आणि ऑनलाईन स्किल गेमिंग क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे. विदेशातील कमाई पूर्णपणे कायदेशीर असल्याचा आणि आंतरराष्ट्रीय बँकिंग कायद्यांचं पालन करुन केलेली असल्याचा दावा त्यानं केला आहे.  

सुकेश चंद्रशेखरवर कोणते आरोप? 

सुकेश चंद्रशेखरवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचे आणि मनी लाँड्रिंगचे गंभीर आरोप आहेत. 200 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणी ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात तो आहे. रॅनबॅक्सीचे माजी प्रमोटर्स शिविंदर सिंह आणि मलविंदर सिंह यांच्या पत्नींची 200 कोटींच्या फसवणूक प्रकरणात तो अडकला आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि इतर यंत्रणांच्या कडून देखील त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून ती प्रकरण देखील सुरु आहेत. सुकेश चंद्रशेखरवर श्रीमंतांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुकेश चंद्रशेखरचं नाव बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस सोबत देखील चर्चेत यायचं. 

(एबीपी माझा ठग सुकेश चंद्रशेखरनं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना लिहिलेल्या पत्राची पुष्टी करत नाही)

इतर बातम्या :

 
फक्त 250 रुपयात सुरु केली कंपनी, आज 12000 कोटींचं साम्राज्य, RK सिन्हांनी कसा केला विस्तार   

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ६ वाजताच्या 100 हेडलाईन्स- Top 100 headlines at 6AM 13 January 2025   Top 100  06AM SuperfastABP Majha Marathi News Headlines 630AM  Headlines 630 AM 13 January 2025 सकाळी ६.३० च्या हेडलाईन्सWorking HOur Special Report :  90  तासांचा कल्ला, सोशल मिडियावरुन हल्ला50 Years of Wankhede| वानखेडेचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होईल का? काय आहेत MCA चे फ्युचर प्लॅन्स?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..
Kirit Somaiya : बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना अमरावती जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र दिले, किरीट सोमय्यांचा आरोप
Thane : पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
पतंग उडवण्यासाठी चिनी दोरा किंवा मांजा वापरू नये, ठाणे महापालिकेचे आवाहन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
Embed widget