एक्स्प्लोर

नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत असून पंजाब व परिसरात सक्रीय आहे.

Maharashtra Weather Update: अवकाळी पावसाला गेल्या चार दिवसात तयार झालेली पोषक स्थिती आता विरली आहे. परिणामी राज्यात पुन्हा एकदा हवेचे कोरडे झोत वाहू लागणार आहेत.त्यामुळे वातावरणातला गारठा वाढणार असून किमान तापमान येत्या  3 दिवसात 2-3 अंशांनी कमी होणार असल्याचं हवामान विभागानं संगितलंय. (IMD Forecast)

गेल्या दोन दिवसांपासून अरबी समुद्रात आर्द्रता तयार झाल्यामुळे राज्यावर अवकाळी पावसाचे सावट होते. काही भागात हलक्या ते मध्यम सरींनी हजेरी लावली. किमान आणि कमाल तापमान काही अंशांनी वाढले होते. त्यामुळे नागरिकांना पहाटे गारवा आणि दुपारी उकाड्याचा सामना करावा लागला. पावसाचा जोर अधिक नसला तरी ढगाळ वातावरणाने शेतकरी चितेंत होते. आता पुन्हा एकदा थंडीला पोषक हवामान होत असून किमान तापमान हळूहळू घटणार आहे.  राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलीच घट झाली होती. पहाटे हाडं गोठवणाऱ्या थंडीनं नागरिक कुडकुडले होते. आता येत्या दोन दिवसात राज्यात किमान तापमान घसरणार आहे. 

हवामान विभाागाचा अंदाज काय?

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात चक्राकार वारे वाहत असून पंजाब व परिसरात सक्रीय आहे. उत्तरेत पश्चिमेकडील वाऱ्यांचे झोत येत आहेत. त्यामुळे थंडी कमी अधिक होत असून जमिनीलगत दाट धुक्याचं साम्राज्य तयार झाले आहे. उत्तरेकडील बदललेल्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून आता तापमानात येत्या तीन दिवसात घट होणार असल्याचं सांगण्यात आलंय. प्रादेशिक हवामान केंद्राच्या अहवालानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात येत्या 4-5 दिवसांत हवामानात फारसा फरक नसेल. पण येत्या 48 तासांत किमान व कमाल तापमान 1-2 अंशांनी कमी होणार आहे. विदर्भात हलक्या पावसाची शक्यता आहे. (Temperature today)


नागरिक पुन्हा गारठणार, राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान खात्यानं सांगितलं, येत्या 3 दिवसांत..

मुंबईकरांना तापमानात दिलासा

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पहाटे हलका गारवा आणि दुपारी  घामाच्या धारांसह प्रचंड उकाड्याला नागरिक सामोरं जातायत. गेल्या आठवड्यात कमाल तापमान 35 अंशांपर्यंत जाऊन ठेपलं होतं. मागील दोन दिवसांपासून पहाटेचा गारवा वाढलाय.त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. आता कमाल आणि किमान तापमानात आजपासून 2-3 अंशांनी घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळणार आहे. मुंबईत 35 अंशांपर्यंत गेलेला कमाल तापमानाचा पारा 28-30 अंशांपर्यंत येण्याची शक्यता आहे.  (IMD Weather Update)

हेही वाचा:

मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, किमान तापमानासह कमाल तापमानात होणार घट, काय सांगितलंय IMD ने?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain Update: देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
देशात 13 टक्के पर्जन्य तूट; एल निनोमुळे शेतकरी मोठ्या संकटात, राज्यात सप्टेंबरमध्येही पावसाची ओढ? हवामान विभागाकडून महत्त्वाची अपडेट
Pune Crime News: नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
नात्यातील महिलेच्या मोबाईलवर मेसेज पाठवला; पुण्यातून अपहरण, सांगलीत संपवले, तपासानंतर पोलिसही चक्रावले!
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Narendra Dabholkar and Sachin Andure: मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती
मोठी बातमी: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन, जन्मठेपेच्या शिक्षेलाही स्थगिती

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
Embed widget