एक्स्प्लोर
नवाजुद्दीन सिद्दीकी उद्धव ठाकरेंच्या भेटीला
23 जानेवारी 2019 रोजी ठाकरे हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
मुंबई: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. नवाजुद्दीन सिद्दीकी हा बहुचर्चित ठाकरे चित्रपटात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणार आहे. त्यानिमित्ताने नवाजुद्दीनने उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत उपस्थित होते. संजय राऊत हे या सिनेमाची निर्मिती करत आहेत. संजय राऊत यांनी सिनेमाची पटकथा लिहिली आहे. त्यांना यासाठी चार वर्ष लागली.
या सिनेमाचं दिग्दर्शन अभिजीत पानसे यांनी केलं असून, 23 जानेवारी 2019 रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान, 21 डिसेंबर 2017 रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या टीझर आणि पोस्टरचं लाँचिंग करण्यात आलं.
“बाळासाहेबांसोबत मी जास्त काळ घालवला होता. त्यांना मी जास्त ओळखतो. ज्यांच्या आयुष्यात असं बरंच काही आहे, जे मोठ्या पडद्यावर दाखवलं जाऊ शकतं. ते जनतेचे नेते होते. मेनस्ट्रीममध्ये हा चित्रपट लोकप्रिय व्हावा," असं मला वाटतं, असं संजय राऊत यांनी टिझर लाँचिंगवेळी म्हटलं होतं.
संबंधित बातम्या
... म्हणून बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनची निवड : संजय राऊत
'ठाकरे' सिनेमाचा टीझर लाँच, रिलीजचा मुहूर्तही ठरला!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
सोलापूर
Advertisement