Biopics On Cricketers : एम. एस धोनी ते चकदा एक्सप्रेस; क्रिकेटर्सचं आयुष्य रुपेरी पडद्यावर उलगडणारे चित्रपट
Biopics On Cricketers : जाणून घेऊयात क्रिकेटर्सचं आयुष्य रुपेरी पडद्यावर मांडणारे काही चित्रपट...
Biopics On Cricketers : भारतात 'क्रिकेट' हा खेळ नसून ती एक भावना आहे, असं म्हटलं जातं. कोणताही क्रिकेटचा समाना अगदी न चुकता पाहणारे अनेक क्रिकेटप्रेमी आहेत. काही क्रिकेटप्रेमी हे चित्रपटामधील अभिनेत्यापेक्षा क्रिकेटच्या मैदानामधील खेळाडूला हिरो मानतात. क्रिकेटर्सचा चाहता वर्ग मोठा असतो. क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सुक असतात. जाणून घेऊयात क्रिकेटर्सचं आयुष्य रुपेरी पडद्यावर मांडणारे काही चित्रपट...
एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी (MS Dhoni: The Untold Story)
'एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाचे कथानक हे क्रिकेटर महेंद्रसिंह धोनीच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट 2016 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये एम एस धोनीची भूमिका दिवंगत अभिनेता सुशांत सिंहने साकारली होती. या सिनेमामुळे सुशांत सिंहला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.
800
800 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता विजय सेतुपती हा प्रमुख भूमिका साकारणार आहे. 800 हा चित्रपट श्रीलंकन क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन याच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. श्रीपथी रंगासामी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. मुथय्याचं मैदानाच्या बाहेरचं आयुष्य देखील या चित्रपटामध्ये दाखवण्यात येणार आहे.
चकदा एक्सप्रेस (Chakda Xpress)
चकदा एक्सप्रेस या चित्रपटाचं कथानक क्रिकेटर झूलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. झूलन गोस्वामी या एक फास्ट बॉलर आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा ही प्रमुख भूमिका साकारणार आहे. सध्या अनुष्का ही या चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
शाबास मिथू (Shabaash Mithu)
15 जुलै 2022 रोजी 'शाबास मिथू' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे कथानक हे भारतीय क्रिकेटर मिताली राजच्या आयुष्यावर आधारित असणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अभिनेत्री तापसी पन्नू ही या चित्रपटामध्ये मिताली राजची भूमिका साकारणार आहे. तापसी पन्नू बरोबरच अभिनेते विजय राज, अजित अंधारे आणि अभिनेत्री प्रिया अवोन हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
कौन प्रवीण तांबे? (Kaun Pravin Tambe?)
क्रिकेटर प्रवीण तांबेच्या जीवनावर आधारित असणारा कौन प्रवीण तांबे? हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. या चित्रपटामधील अभिनेता श्रेयस तळपदेच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली 1 एप्रिल 2022 रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता.
हेही वाचा: