एक्स्प्लोर

Jawan: 'पैसे परत द्या!' शाहरुखचा जवान पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी केली मागणी; नेमकं काय घडलं? तरुणीनं व्हिडीओच्या माध्यमातून सांगितली संपूर्ण घटना

एका तरुणीनं शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) जवान (Jawan) या चित्रपटाबाबत शेअर केलेल्या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Jawan: अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) जवान (Jawan) चित्रपट हा सध्या देशातीलच नाही तर परदेशातील बॉक्स ऑफिसवर देखील धुमाकूळ घालत आहे. सध्या शाहरुखच्या जवान या चित्रपटाबाबत एका तरुणीनं शेअर केलेल्या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. जवान चित्रपटाचा शो सुरु असताना थिएटरमध्ये घडलेल्या एका घटनेचा व्हिडीओ सहार रशीद या मेकअप आर्टिस्टने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.  

सहार रशीद व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे की,'जवान चित्रपटाचा शो सुरु असताना चित्रपटाचा दुसरा भाग आधीच दाखवण्यात आला. त्यानंतर चित्रपट संपला. आम्हाला थिएटरच्या स्क्रिनवर इंटरव्हल असं लिहिलेलं दिसलं. आम्ही हा विचार केला की व्हिलन मेला मग इंटरव्हल कसा काय असेल? त्यानंतर आम्हाला लक्षात आलं की, त्यांनी चित्रपटाचा पहिला भाग दाखवलाच नाही. त्यांनी इंटरव्हलच्या नंतरचा भाग आधीच दाखवला. हे आमच्यासोबत आयुष्यात पहिल्यांदाच झालंय.'  सहार रशीदनं व्हिडीओमध्ये सांगितलं की, 'चित्रपट पाहण्यास आलेले लोक पैसे परत देण्याची मागणी करत आहेत.'

सहार रशीदनं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, 'मी अनेक वर्षांनंतर शाहरुखचा चित्रपट पाहण्यासाठी गेले असताना काय घडले? हे पाहण्यासाठी कृपया संपूर्ण व्हिडिओ पाहा!'

पाहा व्हिडीओ:

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Makeup by Sahar Rashid (@makeupbysaharrashid)

सहार रशीद शेअर केलेल्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली,   'क्लायमॅक्स कळाला असेल, रहस्य कळालं असेल, पण तुम्हाला चित्रपटाचा विषय समजला नसेल.' 

जवान चित्रपटाचं सध्या अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटामधील डायलॉग्स, गाणी आणि चित्रपटामधील अॅक्शन सीन्स या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांची मनं जिंकत आहेत. 

'जवान' या चित्रपटात शाहरुखसोबतच विजय सेतुपती, नयनतारा, दीपिका पादुकोण, संजय दत्त, सान्या मल्होत्रा, प्रियामणी, रिद्धी डोगरा, गिरिजा ओक या कलाकारांनी  काम केलं आहे. जवान चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीनं केलं आहे. जवान चित्रपटामधील 'जिंदा बंदा', 'चलेया' आणि 'नॉट रमैया वस्तावैया' ही गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या गाण्यांना नेटकऱ्यांची पसंती मिळाली.

इतर महत्वाच्या बातम्या:

'जबरा फॅन'! 'जवान' फिल्मची क्रेझ, शाहरुखच्या चाहत्याने चक्क 'थिएटरमधून काम' केलं, Work From Theater चा फोटो व्हायरल

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khan Koffee With Karan 9: 'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
'धुरंधर'मधला रणवीर सिंह की, 'अॅनिमल'मधला रणबीर कपूर... फेवरेट कोण? सलमान खान म्हणाला...
Ramayana New Trailer Yash Ranbir Kapoor: रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये रावणाची दहशत, साऊथ सुपरस्टार यशचा धडकी भरवणारा अंदाज; ट्रेलर पाहिलात?
Nana Patekars Son Malhar On Actors Final Moments: 'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
'नाना पाटेकरांचं माधुरी दीक्षितसोबत शूट ठरलेलं, पण...'; 'त्या' रात्री गोव्यात नेमकं काय घडलं? मल्हार पाटेकरनं स्पष्टच सांगितलं
Youtuber Sourav Joshi Trolled: बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'
बायकोला कुत्र्याच्या भांड्यातून पाणी पाजलं, कोट्यधीश युट्यूबर सौरव जोशी ट्रोल; आता म्हणतोय, 'कुत्रा आमच्या घरातलाच...'

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Asaduddin Owaisi On Elon Musk : मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
मोदींवर टीका करणाऱ्या इलॉन मस्कला ओवैसींचा इशारा, परदेशी व्यक्तीने पंतप्रधानांवर बोललेलं ऐकून घेणार नाही...
Embed widget