एक्स्प्लोर
Advertisement
मनसेचं 6 ऑगस्टपासून रिअॅलिटी 'कान'चेक आंदोलन
प्रेक्षकांना 1 ऑगस्टपासून मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार आहेत. सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत
मुंबई : मल्टिप्लेक्समध्ये सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही हे आता मनसे तपासणार आहे. आदेशाची अंमलबजावणी होत नसेल तर मनसे 6 ऑगस्टपासून रिअॅलिटी 'कान'चेक आंदोलन करणार आहे.
प्रेक्षकांना 1 ऑगस्टपासून मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ नेता येणार आहेत. सरकारने या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. मनसेचे कार्यकर्ते 6 तारखेपासून सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी होते की नाही हे तपासणार आहेत. अंमलबजावणी झाली नाही तर मनसे मल्टिप्लेक्सच्या स्टाफला कानाखाली लगावून रिअॅलिटी 'कान'चेक आंदोलन करणार आहेत.
हायकोर्टाने वारंवार प्रश्न उपस्थित करुनही थिएटरमधील खाद्य पदार्थांच्या मनमानी किमती कमी होत नव्हत्या. शिवाय मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेने खळ्ळखट्याक आंदोलन केलं होतं. आंदोलनादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी थिएटर कर्मचाऱ्यांना मारहाणही केली होती. त्यानंतर हा मुद्दा राज्यभर गाजला होता.
मल्टिप्लेक्सवाल्यांची मुजोरी कायम
दरम्यान, मल्टिप्लेक्सचालकांची मुजोरी अजूनही कायम असल्याचं दिसत आहे. त्यासंदर्भात मनसेने पुन्हा परिपत्रक काढून मल्टिप्लेक्सचालक आणि सरकारला इशारा दिला आहे. सरकारचा आदेशनही न जुमानणाऱ्या मल्टिप्लेक्सचालकांना कुणाचं अभय आहे, असा प्रश्न मनसेने विचारला आहे.
संबंधित बातम्या
5 रुपयांचे पॉपकॉर्न मल्टिप्लेक्समध्ये 250 रुपयांत का?: हायकोर्ट
मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही- राज्य सरकार
मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाकडून राज ठाकरेंच्या या 9 अटी मान्य
मुंबई : मल्टिप्लेक्समध्ये प्रेेक्षकांची कशी होते लूट?
माझा विशेष : मल्टीप्लेक्समधील तोडफोडीची जबाबदारी कोणाची?
5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना का? पुण्यात मनसैनिकांची थिएटर मॅनेजरला मारहाण
मल्टिप्लेक्समध्ये सरसकट खाद्यपदार्थांवर बंदी घालणार का? : हायकोर्ट
थिएटरमध्ये बाहेरील खाद्यपदार्थांना मनाई कायदेशीर कशी? : कोर्ट
चित्रपटाचं तिकीट 200 पेक्षा जास्त नाही, कर्नाटक सरकारचे आदेश
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement