(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Milind Soman: पठाणमधील 'बेशरम' गाण्याच्या वादानंतर मिलिंद सोमणला आठवलं न्यूड फोटोशूट; म्हणाला, "कला की अश्लीलता हे..."
पठाण (Pathaan) या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्याच्या वादावर मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) यानं प्रतिक्रिया दिली आहे.
Milind Soman Nude Photoshoot: प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता असणारा मिलिंद सोमण (Milind Soman) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असतो. वेगवेगळे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करतो. मिलिंद त्याच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतो. वर्क-आऊट करतानाचे फोटो आणि व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करतो. सोशल मीडियावर मिलिंदच्या प्रत्येक पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये मिलिंदला शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) या गाण्याच्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाला मिलिंद सोमण?
पठाण चित्रपटातील बेरशम रंग हे गाणं रिलीज झाल्यानंतर या गाण्यातील दीपिकाच्या बिकीनीच्या रंगावर काही लोकांनी आक्षेप घेतला आहे. या सर्व वादानंतर मिलिंदला त्याचं न्यूड फोटोशूट आठवलं. 14 वर्षांपूर्वी मिलिंद सोमणनं मधु सप्रेसोबत (Madhu Sapre) एक फोटोशुट केलं होते. या न्यूड फोटोशूटमुळे मिलिंद हा वादाच्या भोवऱ्यात अडकला. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये मिलिंदला पठाण चित्रपटातील बेशरम रंग गाण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तो म्हणाला, 'ही कला की अश्लीलता हे कोर्ट ठरवेल.'
250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. हा चित्रपट 8 देशांमध्ये शूट झाला आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तानमध्ये याचे चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाच्या दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाती वाट शाहरुख आणि दीपिकाचे चाहते उत्सुकतेने बघत आहेत.
View this post on Instagram
1995 साली प्रदर्शित झालेल्या अलीशा चिनॉय यांच्या मेड इन इंडिया या गाण्यामुळे मिलींदला विशेष लोकप्रियता मिळाली. त्यानंतर मिलींद मॉडेल झाला. त्याच प्रमाणे अनेक चित्रपट, वेब सिरीज आणि म्यूझिक व्हिडीओमध्ये मिलींदने काम केले आहे. सध्या तो 'सुपर मॉडल ऑफ द ईयर' या शोच्या परिक्षकाच्या भूमिकेत दिसतो.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: