Mika Singh Tweet: 'हा सुकेशपेक्षा चांगला आहे...'; जॅकलिनच्या फोटोवर मिका सिंहनं केलेल्या कमेंटनं वेधलं लक्ष
नुकताच जॅकलिननं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला गायक मिका सिंहनं (Mika Singh) केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले.
Mika Singh Tweet: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) ही गेल्या काही महिन्यांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिचं नाव मनी लॉन्ड्रिंग प्रकरणीशी जोडलं गेलं. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekar ) सध्या तुरुंगात आहे. जॅकलिन ही सुकेश चंद्रशेखरला डेट करत होती तसेच तिनं सुकेशकडून काही महागड्या वस्तू गिफ्ट म्हणून घेतल्या होत्या, असंही म्हटलं जात आहे. सुकेश आणि जॅकलिनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते. आता नुकताच जॅकलिननं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला गायक मिका सिंहनं (Mika Singh) केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले.
जॅकलिननं ट्विटरवर हॉलिवूड स्टार जीन-क्लॉड व्हॅन डॅमेसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं कॅप्शन दिलं,'विथ लेजंड व्हॅन डॅमे, या कोलॅबची उत्सुकतेने वाट बघत आहे' जॅकलिननं शेअर केलेल्या या फोटोवर मिका सिंहनं कमेंट केली, "तू खूप सुंदर दिसत आहेस, हा सुकेशपेक्षा चांगला आहे." मिका सिंहनं केलेल्या या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधले. मिकानं नंतर ही कमेंट डिलीट देखील केली.
With the legend Van Dam!! Can’t wait for this collab! pic.twitter.com/NsVVF9O7EZ
— Jacqueline Fernandez (@Asli_Jacqueline) September 29, 2023
मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सुकेश चंद्रशेखर हा सध्या अटकेत आहे. सुकेशने 200 कोटींच्या मनी लाँड्रिंगच्या पैशातून बॉलिवूड अभिनेत्रींना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. याप्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचं नाव समोर आले होते.सुकेश चंद्रशेखरने 5 जनावरं जॅकलिनला गिफ्ट म्हणून दिल्याचे समोर आले होते. त्यातल्या अरबी घोड्याची किंमत तब्बल 52 लाख रूपये होती.
जॅकलिनचे चित्रपट
जॅकलिन ही लवकरच वेलकम टु द जंगल (Welcome to the Jungle) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सर्कस आणि रामसेतू हे तिचे चित्रपट काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. जॅकलिनच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. जॅकलिनचा वेलकम टु द जंगल हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. असून त्याचे दिग्दर्शन अहमद खान करणार आहेत. या चित्रपटात जॅकलिनसोबत अक्षय कुमार, संजय दत्त, सुनील शेट्टी, अर्शद वारसी, परेश रावल, जॉनी लीव्हर, राजपाल यादव यांसारखे कलाकार काम करणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :