एक्स्प्लोर
अभिनेत्री मेरिल स्ट्रीपचा विक्रम, ऑस्करसाठी 20 व्यांदा नामांकन
न्यूयॉर्क : हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांनी आपणच चित्रपट जगतातील अनभिषिक्त सम्राज्ञी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. अत्यंत मानाच्या ऑस्कर अर्थात अकॅडमी अवॉर्ड्ससाठी मेरिल यांना 20 व्यादा नामांकन मिळालं आहे. हे नॉमिनेशन मिळवत मेरिल स्ट्रीप यांनी स्वतःचाच विक्रम मोडित काढला आहे.
फ्लॉरेन्स फॉस्टर जेनकिन्स या चित्रपटासाठी मेरिल स्ट्रीप यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या विभागात नामांकन मिळालं आहे. नुकतंच स्ट्रीप यांना गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्येही सीसील बी. डीमिली पुरस्काराने (जीवनगौरव पुरस्कार) सन्मानित करण्यात आलं.
गेल्या काही वर्षांपासून 67 वर्षीय मेरिल स्ट्रीप यांच्या नावे सर्वाधिक ऑस्कर नामांकन पटकवण्याचा विक्रम आहे. यंदा त्यांना मिळालेल्या नामांकनाच्या संख्येत एकाने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक ऑस्कर नामांकनांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर दोघींमध्ये टाय आहे. कॅथरिन हेपबर्न आणि जॅक निकोलसन यांना प्रत्येकी 12 नामांकनं आहेत.
यापूर्वी मिळालेल्या 19 नामांकनांपैकी तीन पुरस्कार मेरिल यांना मिळाले आहेत. 1980 मधील क्रॅमर व्हर्सेस क्रॅमर या चित्रपटातील भूमिकेसाठी (दुसरं नामांकन) सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर त्यांना मिळाला. त्यानंतर 1983 मध्ये सोफीज् चॉईस या चित्रपटासाठी (चौथं नामांकन) त्यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला.
1983 नंतर तब्बल 19 वर्ष त्यांना ऑस्करने हुलकावणी दिली. 2012 मध्ये (17 वं नामांकन) द आयर्न लेडी या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर मिळाला. यूकेच्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटात मेरिल यांनी मुख्य भूमिका साकारली होती.
गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या वेळी मेरिल स्ट्रीप यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर तोफ डागली होती. त्यानंतर ट्रम्प यांनी मेरिल या ओव्हररेटेड अभिनेत्री असल्याची टीका केली होती. त्यामुळे स्ट्रीप यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर मेरिल स्ट्रीप हा हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये आणला.
अभिनेता देव पटेलला ऑस्कर नामांकन
भारतीय वंशाचा ब्रिटीश अभिनेता देव पटेल यालाही ऑस्कर नामांकन मिळालं आहे. 'लायन' चित्रपटातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचं नामांकन मिळालं आहे. देवने स्लमडॉग मिलियनेअर चित्रपटात केलेली जमालची भूमिका गाजली होती. या सिनेमाने ऑस्करवारी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement