Malaika Arora चा वाढदिवसाच्या दिवशी भन्नाट डान्स, थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री मलायका अरोराचा (Malaika Arora) एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये मलायका आपल्या ग्लॅमरस अंदाजात डान्स करताना दिसत आहे.
![Malaika Arora चा वाढदिवसाच्या दिवशी भन्नाट डान्स, थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल Malaika Arora throwback video goes viral on social media Malaika Arora चा वाढदिवसाच्या दिवशी भन्नाट डान्स, थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/15/961159002a53667c1088bddfca472420_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा विविध कारणाने नेहमी चर्चेत असते. नुकतंच तिने आपल्या हातातील अंगठीचा फोटो सोशल मीडियावर टाकला होता. आताही ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने तिच्या वाढदिवासाच्या दिवशी भन्नाट डान्स केला होता. आता तिचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या व्हिडीओत मलायका आपल्या ग्लॅमरस अंदाजात डान्स करताना दिसत आहे. ही व्हिडीओ तिच्या वाढदिवसाच्या वेळेचा असून ती त्यामध्ये बेहोश होऊन नाचताना दिसत आहे. या व्हिडीओत मलायकाच्या डान्स स्टेपसोबतच तिचा वेगळा अंदाज आणि एक्सप्रेशनही पहायला मिळतंय. हा व्हिडीओ जरी जुना असला तरी सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालतोय. त्यावर मलायकाच्या चाहत्यांनी कमेन्टचा पाऊस पाडला आहे.
View this post on Instagram
मलायका स्वत:ला फिट राखण्यासाठी व्यायामासोबतच योगा करते. ती सोशल मीडियामध्ये आपले योगा करतानाचे अनेक फोटो शेअर करते तसेच आपल्या चाहत्यांना फिट राहण्याचे आवाहन करते. मलायकाने काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लस घेतली होती. त्याचाही फोटो मलायकाने शेअर केला होता.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सध्या एकमेकांना डेट करत आहेत. अजून तरी या जोडीने लग्न करण्याचा निर्णय घेतला नाही. ही जोडी सध्या बी टाऊनची सर्वात चर्चेत असणारी जोडी आहे. काही दिवसापूर्वी मलायकाने आपल्या हातात अंगठी घातल्याचा फोटो शेअर केला होता तर अर्जुन कपूरने आपल्या हातात मंगळसूत्र घेतल्याचा फोटो शेअर केला होता. त्यावरुन या दोघांचा साखरपुडा वा लग्न झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती. अद्यापतरी या दोघांनी या गोष्टीवर कोणताही खुलासा केला नाही.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)