एक्स्प्लोर
मी आयटम साँगमध्येच खुष, सिनेमांकडे जास्त ओढा नाही: मलायका

मुंबई: अभिनेत्री मलायका अरोरा 'मुन्नी बदनाम हुई', 'छैय्या, छैय्या' यासारख्या आयटम साँगमुळे बरीच लोकप्रिय झाली. त्यामुळेच आजही तिचा ओढा आयटम साँगकडेच असल्याचं तिचं म्हणणं आहे. मलायकाच्या मते, आपण सिनेमातील मोठ्या व मुख्य भूमिका साकारु शकत नाही. त्यामुळे आपण आयटम साँग करण्यातच खुष आहोत. असं तिचं मत आहे. कौटुंबिक जबाबदारीमुळे मोठ्या पडद्यापासून दूर राहणं पसंत करतेस का? याबाबत बोलताना मलायका म्हणाली की, 'असं अजिबात नाही. मोठ्या पडद्याकडे माझा कधीच फार ओढा नव्हता. पण मला मोठ्या पडद्यावर फक्त आयटम साँग करणं आवडतं. मी संपूर्ण सिनेमात काम करणं हे मला पटत नाही.'
दरम्यान, मलायका नुकतीच लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी मलायका म्हणाली की, 'मी एक आई आहे आणि माझ्यावर मुलाची जबाबदारी आहे म्हणून मी मोठ्या पडद्यापासून दूर राहते. असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे.' मोठ्या पडद्यापेक्षा तू छोट्या पडद्याला पसंती देतेस, त्याचं नेमकं कारण काय? याबाबत मलायका म्हणाली की, 'टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही घरा-घरात पोहचतात. तुम्ही लोकांशी जोडले जातात. त्यामुळेच मी छोट्या पडद्याला पसंती दिली. तर मोठ्या पडद्यावरील सिनेमे पाहण्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडावं लागतं.' सध्या मलायका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे. टीव्ही शो 'नच बलिए', 'जरा नचके दिखा', 'झलक दिखला जा' आणि 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्ये ती दिसून आली होती. संबंधित बातम्या:
दरम्यान, मलायका नुकतीच लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी मलायका म्हणाली की, 'मी एक आई आहे आणि माझ्यावर मुलाची जबाबदारी आहे म्हणून मी मोठ्या पडद्यापासून दूर राहते. असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते चूक आहे.' मोठ्या पडद्यापेक्षा तू छोट्या पडद्याला पसंती देतेस, त्याचं नेमकं कारण काय? याबाबत मलायका म्हणाली की, 'टीव्हीच्या माध्यमातून तुम्ही घरा-घरात पोहचतात. तुम्ही लोकांशी जोडले जातात. त्यामुळेच मी छोट्या पडद्याला पसंती दिली. तर मोठ्या पडद्यावरील सिनेमे पाहण्यासाठी तुम्हाला घरातून बाहेर पडावं लागतं.' सध्या मलायका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा आहे. टीव्ही शो 'नच बलिए', 'जरा नचके दिखा', 'झलक दिखला जा' आणि 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्ये ती दिसून आली होती. संबंधित बातम्या: आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
राजकारण























