Made In Heaven Season 2: प्रतीक्षा संपली! 'मेड इन हेवन 2' येणार प्रेक्षकांच्या भेटीस, फरहान अख्तरनं खास पोस्ट शेअर करत केली घोषणा
आता मेड इन हेवन (Made In Heaven) या सीरिजच्या निर्मात्यांनी या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे.
Made In Heaven Season 2: अभिनेत्री शोभिता धुलिपाला (Sobhita Dhulipala) आणि अभिनेता अर्जुन माथूर (Arjun Mathur) यांच्या मेड इन हेवन (Made In Heaven) या सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या मालिकाच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. मेड इन हेवन ही सीरिज 2019 मध्ये प्रदर्शित झाली. आता या सीरिजच्या निर्मात्यांनी या सीरिजच्या दुसऱ्या सीझनची घोषणा केली आहे.
मेड इन हेवन ही सीरिज तारा आणि करण या दोन वेडिंग प्लॅनरभोवती फिरतो. ताराची भूमिका शोभिता आणि करणची भूमिका अर्जुनने साकारली. जोया अख्तर. रीमा कागती, रितेश सिधवानी, झोया अख्तर, रीमा कागती आणि फरहान अख्तर यांनी या सीरिजची निर्मिती केली आहे. आता या सीरिजचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
फरहान अख्तरने शेअर केलं ट्वीट
मेड इन हेवन सीरिजचा निर्माता फरहान अख्तरने (Farhan Akhtar) ट्विट करून मेड इन हेवन- 2 (Made In Heaven Season 2) या सीरिजची घोषणा केली आहे. फरहाननं या सीरिजचं पोस्ट ट्विटरवर शेअर करुन लिहिलं, 'मोठ्या वेडिंग सीझनची तयारी करत आहोत.'
Prepping for the biggest wedding season#MadeInHeavenS2OnPrime coming soon@PrimeVideoIN @excelmovies @tigerbabyfilms @sobhitaD #ArjunMathur @jimSarbh @kalkikanmani @ShashankSArora #ShivaniRaghuvanshi #MonaSingh @ActorVijayRaaz #ZoyaAkhtar @kagtireema @nitya_mehra @alankrita601… pic.twitter.com/Ucoa8TPQIv
— Farhan Akhtar (@FarOutAkhtar) July 6, 2023
प्राइम व्हिडीओच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर देखीलमेड इन हेवन सीरिजच्या दुसऱ्या सीझनचं पोस्टर शेअर करण्यात आलं आहे, 'मेड इन हेवन सीझन 2 लवकरच प्राइम वर येईल.' असं कॅप्शन या पोस्टरला देण्यात आलं आहे. या पोस्टवर अनेकांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
'मेड इन हेवन'ची स्टार कास्ट
मेड इन हेवन या सीरिजमध्ये शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथुर यांच्याशिवाय कल्की कोचलिन, शशांक अरोरा, शिवानी रघुवंशी, जिम सरभ रसिका दुग्गल या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. आता मेड इन हेवन सीझन-2 मध्ये कोणते कलाकार काम करणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Delhi Crime पासून Mirzapur पर्यंत 'रसिका दुग्गल'च्या 'या' दमदार भूमिका