Sushmita Sen : सुष्मिता सेनने सोशल मीडियावर शेअर केला सिझलिंग व्हिडीओ, ललित मोदी कमेंट करत म्हणाले...
Sushmita Sen, Lalit Modi : रिलेशनशिप जगजाहीर केल्यापासून अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि उद्योगपती ललित मोदी (Lalit Modi) सतत चर्चेत असतात.
Sushmita Sen, Lalit Modi : रिलेशनशिप जगजाहीर केल्यापासून अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) आणि उद्योगपती ललित मोदी (Lalit Modi) सतत चर्चेत असतात. सुष्मिता सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटतेय. नुकताच सुष्मिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हेकेशन व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती समुद्रात पोहोताना दिसत आहे. सुष्मिताच्या या पोस्टवर ललित मोदींनीही कमेंट केली आहे. त्यांच्या या कमेंटने मात्र साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
सुष्मिता सध्या सार्दिनियामध्ये भटकंती करत आहे. यादरम्यान तिने जलक्रीडेचा आनंद देखील घेतला. सुष्मिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सार्दिनियाच्या निळ्याशार समुद्रात पोहोतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर आता ललित मोदी यांनी कमेंट केली आहे. 'सार्दिनियामध्ये तू हॉट दिसत आहेस', असे त्यांनी आपल्या कमेंटमध्ये म्हटले आहे.
पाहा व्हिडीओ :
या व्हिडीओमध्ये सुष्मिता यॉटवरून थेट समुद्रात उडी घेताना दिसत आहे. सुष्मिता सेनने या व्हिडीओसोबत एक कॅप्शनदेखील लिहिले आहे. 'सरळ उभे राहा, श्वास घ्या, श्वास सोडा आणि मग झोकून द्या.. सागराला कवेत घेतना शरणागतीचा हा धडा मी शिकले आहे.’
सुष्मिता मुलींसोबत व्हेकेशन मोडवर!
यानंतर सुष्मिताने आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्कुबा डायव्हिंग करताना दिसत आहे. यात तिने समुद्राखालचं सुंदर जग दाखवलं आहे. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत तिच्या मुलीदेखील दिसत आहेत. तर सुष्मिताच्या या व्हिडीओमध्ये तिचे वडील देखील सामील झाले आहेत. सुष्मिताने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये याचा उल्लेख केला आहे.
नव्या रिलेशनशीपमुळे चर्चेत
अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या ललित मोदीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. ललित मोदींनी नुकतेच सोशल मीडियावर जाहीर केले की, ते सुष्मिताला डेट करत आहेत. ललित यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये सुष्मितासोबतचे काही फोटोही शेअर केले होते, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. आता सुष्मिताने देखील तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
लवकरच लग्न करण्याची शक्यता
ललित मोदी आणि सुष्मिता सेन यांच्या वयामध्ये 10 वर्षाचे अतंर आहे. ललित हे 56 वर्षाचे आहेत. तर सुष्मिता ही 46 वर्षांची आहे. ललित मोदी यांनी ट्वीट शेअर करुन सुष्मिता आणि त्यांच्या नात्याची माहिती नेटकऱ्यांना दिली.पहिल्या ट्विटमध्ये सुष्मिता सेन हिचा ‘बेटरहाफ’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर दुसऱ्या अन्य एका ट्विटमध्ये आम्ही अद्याप लग्न केले नाही. आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. लवकरच लग्न करु असे म्हटलेय.
संबंधित बातम्या