Kiran Mane: 'फुले, शाहू, आंबेडकरांच्या आयुष्यातल्या संघर्षाची उदाहरणं द्यायचो. पण...'; किरण मानेंची पोस्ट चर्चेत
नुकतीच किरण माने (Kiran Mane) यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी बिग बॉसच्या घरामधील एक किस्सा नेटकऱ्यांसोबत शेअर केला.
Kiran Mane: किरण माने (Kiran Mane) हे छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेते आहेत. किरण माने हे मराठी बिग बॉस या कार्यक्रमामुळे चर्चेत होते. बिग बॉस मराठीच्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4) सिझनमध्ये किरण माने यांनी सहभाग घेतला होता. बिग बॉस मारठी या शोमध्ये असताना किरण माने यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. नुकतीच किरण माने यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी बिग बॉसच्या घरामधील एक किस्सा नेटकऱ्यांसोबत शेअर केला.
किरण माने यांनी सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून बिग बॉसच्या घरमाधील एक घटना सांगितली. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं, "बिगबाॅसचं घर... राखी किचनमध्ये होती. मी लिव्हींग एरीयातनं राखीला आवाज दिला, "राखीS... आज 6 डिसेंबर... जयभीम !" राखीनंही जोरदार नारा दिला, "जयभीSSSम" ! .'बिगबाॅस'मधल्या माझ्या लै लै लै नादखुळा, भन्नाट आठवणी आहेत. मैत्रीच्या, दुश्मनीच्या, शड्डू ठोकून आव्हान देत जिंकलेल्या टास्कच्या, 'डोक्यॅलिटी' वापरुन आखलेल्या स्ट्रॅटेजीजच्या, वादविवादांच्या, हास्यविनोदांच्या, सुत्रसंचालन, डान्सपासून अभिनयापर्यन्त अनेक गोष्टींमध्ये 'चमकण्याच्या' सुद्धा. पण त्या सगळ्यात, माझ्या काळजाच्या कप्प्यात 'स्पेशल' स्थान आहे ते मी आणि राखी सावंतनं ज्ञानसुर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना दिली त्या आठवणीला !"
पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'बिगबाॅसच्या घरात यापूर्वी कधी झाल्या नसतील अशा गोष्टी मी केल्या. रोज सकाळी तुकोबारायांचा एक अभंग सांगून दिवसाची सुरूवात करायचो. अनेक प्रसंगी गौतम बुद्ध, छ. शिवराय, फुले,शाहू,आंबेडकरांच्या आयुष्यातल्या संघर्षाची उदाहरणं द्यायचो. पण झालं असं, की काही स्पर्धकांना ते खुपू लागलं. का कुणास ठावूक पण त्यावर ते विनाकारण ऑब्जेक्शन घ्यायला लागले. भांडणं होऊ लागली. त्यांना वाटायचं मी हे कॅमेऱ्यासाठी करतोय . दोघातिघांनी यावरनं मला टार्गेट करणं सुरू केलं. खूप वाद घातले. "
किरण माने यांच्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. त्यांच्या या पोस्टला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स देखील केल्या आहेत.
पाहा किरण माने यांची संपूर्ण पोस्ट
किरण माने यांनी माझ्या नवऱ्याची बायको, मुलगी झाली हो या मालिकांमध्ये काम केलं. किरण माने हे त्यांच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. बिग बॉस मराठी या शोमुळे त्यांनी विशेष लोकप्रियता मिळाली.
इतर महत्वाच्या बातम्या:
Kiran Mane: 'चूक नसताना माझ्यावर आभाळ कोसळलं होतं...'; किरण मानेंची पोस्ट चर्चेत