Kiran Mane: 'तेंडल्या' चित्रपटासाठी किरण मानेंनी शेअर केली खास पोस्ट; म्हणाले, 'सातारकर भावाबहिणींनो...'
'तेंडल्या' (Tendlya) या चित्रपटासाठी किरण माने यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.
Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे मराठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. किरण यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. त्यांच्या पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. नुकतीच 'तेंडल्या' (Tendlya) या चित्रपटासाठी किरण माने यांनी एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून किरण माने यांनी तेंडल्या या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
किरण माने यांची पोस्ट
किरण माने यांनी फेसबुकवर तेंडल्या या चित्रपटासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'बड्या सिनेमाच्या झंझावातात 'तेंडल्या' दमदारपणे पीचवर उभा आहे. चुकवू नये असं, अस्सल आणि मनोरंजन बऱ्याच वर्षांनी मराठीत आलं आहे. सातारकर भावाबहिणींनो, आपल्याकडं रात्री 8 चा शो आहे. मी आज तिसऱ्यांदा बघणार आहे. तुम्हीही माझ्यासोबत या आणि बघा.'
किरण माने यांनी तेंडल्या चित्रपटात तेंडल्याची भुमिका साकारणारा अभिनेता अमन कांबळेसाठी देखील एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं, 'अमन कांबळे या पोरानं साकारलेली तेंडल्याची भुमिका आपल्याला पार भिरकिट करून टाकते. सचिनचं आणि क्रिकेटचं 'याड' लागलेला तेंडल्या आपल्याला थेट सातवी आठवीतल्या त्या सतरंगी आणि अतरंगी जगात घेऊन जातो.'
View this post on Instagram
किरण माने यांनी माझ्या नवऱ्याची बायको, मुलगी झाली हो या मालिकांमध्ये काम केलं. किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असतात. त्यांनी 'तेंडल्या' या चित्रपटासाठी केलेल्या पोस्टनं सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. एक वर्षांपूर्वी किरण यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आलं होतं. किरण यांनी आरोप केला होता की, राजकीय भूमिका मांडल्यामुळे त्यांना मालिकेतून बाहेर काढण्यात आलं.
'तेंडल्या' हा मराठी सिनेमा 5 मे 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. 'तेंडल्या' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सचिन जाधव आणि नचिकेत वायकरने सांभाळली आहे. या चित्रपटाचं अनेक जण कौतुक करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
Kiran Mane: लेकीच्या वाढदिवसाला किरण मानेंची खास पोस्ट; म्हणाले, 'तुझा बाप पहाडासारखा...'