एक्स्प्लोर

Kiran Mane: लेकीच्या वाढदिवसाला किरण मानेंची खास पोस्ट; म्हणाले, 'तुझा बाप पहाडासारखा...'

  किरण माने (Kiran Mane) यांनी नुकतीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Kiran Mane:  अभिनेते  किरण माने (Kiran Mane) हे मराठी चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत.  बिग बॉस मराठीच्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4) सिझनमुळे किरण माने यांना विशेष लोकप्रियता मिळाली होती. किरण माने हे विविध विषयांवरील पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. किरण माने यांनी नुकतीच लेकीच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले. 

किरण माने यांनी त्यांची मुलगी ईशा हिच्यासोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं,  'तो दिवस अजून आठवतोय. स्कूटरवरून माझ्या इंजिन ऑईलच्या दुकानात जाता-जाता हाॅस्पीटलमध्ये थांबलो. माझी एक दिवसाची छोटी छकुली हातात घेतली.गोड हसली माझ्याकडं बघून. मनात विचार आला ही मोठी झाल्यावर "तुझे बाबा काय करतात?" या प्रश्नाचं काय उत्तर देईल? म्हणेल,"ते दुकानदार आहेत. ऑईल, स्पेअरपार्टस् विकतात." माझ्या अंगावर सर्रर्रर्रकन काटा आला ! म्हन्लं नाय नाय नाय नाय.मला ही ओळख नको. दुकानदारी करणं वाईट नाही.पण माझी पॅशन, माझा श्वास, माझ्या रक्तात 'अभिनय' आहे. कितीही संकटं येऊदेत. काहीही होऊदेत. जग इकडचं तिकडं होऊदेत. मला अभिनय करत रहाण्याचा आनंद घ्यायचाय. माझ्या पोरीनं कधीही अभिमानानं सांगीतलं पायजे "माझे बाबा ॲक्टर आहेत."

अस्वस्थ झालो. सैरभैर अवस्थेत स्कूटर काढली.  स्कूटर तिरकी करून दहा किका मारल्याशिवाय स्टार्ट होत नव्हती. विचारात असल्यामुळं किक मारताना पाय सटकून नडगीवर दणका बसला. खण्ण्णकन. मेंदूत कळ गेली. पण दुर्लक्ष केलं. कारण त्यापेक्षा काळजातली उलघाल जास्त जीवघेणी होती. दुकानात येऊन बसलो. मनात तेच विचार. मला अभिनेता म्हणून जगायचंय. ही दुकानदारी, ही हिशोबाची वही, हा गल्ला, हे माझं जग नाही. सगळ्या ऑईलच्या कॅन्समध्ये मी गुदमरून चाललोय असा भास व्हायला लागला.त्याचदिवशी मी पेपरात जाहिरात बघितली : 'पं. सत्यदेव दूबे यांची पुण्यात अभिनय कार्यशाळा'.तो किस्सा मी यापूर्वी पोस्टमधून लिहीलाय. खूप व्हायरल ही झालाय.पण त्या आधीची ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीतीये.

View this post on Instagram
 
A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

 पुढे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले,  "तर मी दुकानाचं शटर ओढलं आणि दूबेजींकडे जाऊन अभिनयाचा ध्यास घेतला. बेभरवशाचं क्षेत्र निवडल्यामुळं लै ओढाताण झाली. पैशाची कायम चणचण. घरातलं टेन्शन तर स्ट्रगलर्सच्या पाचवीला पुजलेलं. रोजचे खर्च भागवणं मुश्कील असायचं. पण कुणी विचारल्यावर लहानगी ईशा जेव्हा बोबड्या पण खणखणीत आवाजात सांगायची ना, "माजे बाबा ॲक्टल आहेत. तेव्हा लै लै लै भारी वाटायचं मला. सगळा ताण निवळून जायचा. आज तिला बघितलं की लोक म्हणतात, "ही ईशा, ॲक्टर किरण मानेंची मुलगी." ईशाला ते रोजचं सवयीचं झालंय... पण मी जेव्हा-जेव्हा ऐकतो, तेव्हा मी आतून खूप सुखावतो. वाढदिवसाच्या मनभरून शुभेच्छा ईशा. तू माझ्या आयुष्यात बहार घेऊन आलीयेस तुला आयुष्यात जे पायजे ते भरभरून मिळो. खूप आनंदी रहा, हसतमुख रहा. तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझा बाप पहाडासारखा तूझ्या पाठीशी उभा राहिल. लब्यू.'

इतर महत्वाच्या बातम्या: 

Kiran Mane: 'केदार मला 'या' सिनेमात एक भुमिकाही देणार होता, पण...'; किरण मानेंनी शेअर केली पोस्ट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 18 Jan 2025 : ABP MajhaTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget