एक्स्प्लोर
‘खंडेराया झाली माझी दैना' गाण्याचा यूट्यूबवर धुमाकूळ
‘खंडेराया झाली माझी दैना' या नव्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

मुंबई : ‘खंडेराया झाली माझी दैना' या नव्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यूट्यूबवर अवघ्या पाच दिवसात 1 मिलियन म्हणजेच 10 लाखांहून अधिक व्ह्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तसंच हे गाणं यूट्यूबवर ट्रेण्डिंग होत आहे
'खंडेराया झाली माझी दैना' हे गाणं गीतकार, गायक वैभव लोंढे यांच्या आवाजात प्रदर्शित झाले आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुती असलेल्या या गाण्याची निर्मिती चेतन गरुड प्रॉडक्शनने केली आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये गाण्याच्या भाषेला साजेसा असा एक माहोल तयार केला गेला आहे.
ट्रेडिशनल गाण्याला रोमँटिक टच देऊन एक नवे व्हर्जन सादर करण्याचा प्रयत्न संगीत दिग्दर्शकाने केला आहे. वैभव लोंढे यांनी या गाण्याचे बोल लिहिले असून संगीत दिग्दर्शनही केले आहे. साईशा पाठक व वैभव लोंढे यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याचे दिग्दर्शन तेजस पाटील यांनी केले आहे. रवी उछे यांनी गाण्याचे छायाचित्रण केले आहे तर रोहन माने यांनी नृत्यदिग्दर्शन केले आहे. वेगळ्या बाजातील 'खंडेराया झाली माझी दैना' हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंकाच नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
