KGF Chapter 2 : ‘केजीएफ 2’मुळे मेकर्स झाले मालामाल; प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या चित्रपटाने मिळवला तब्बल पाचपट नफा!
KGF Chapter 2 : ‘केजीएफ 2’ (KGF 2) हा भारतीय चित्रपट विश्वातील एक विक्रमी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून आजवर अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत.
KGF Chapter 2 : ‘केजीएफ 2’ (KGF 2) हा भारतीय चित्रपट विश्वातील एक विक्रमी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने रिलीज झाल्यापासून आजवर अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढले आहेत. साऊथ अभिनेता यश (Yash) स्टारर या चित्रपटाने पॅन इंडिया चित्रपटांसाठी एक बेंचमार्क सेट केला आहे. या चित्रपटाने केवळ प्रेक्षकांचे मनोरंजनच केले नाही तर, मेकर्सना देखील मालामाल केले होते. आता या चित्रपटाने वितरकांना देखील प्रचंड नफा मिळवून दिला आहे. या चित्रपटातून वितरकांना किती नफा झाला याचा आकडा नुकताच समोर आला आहे.
‘केजीएफ 2’ या चित्रपटाने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. या चित्रपटातून ‘रॉकी’ म्हणजेच अभिनेता यश याला देखील प्रचंड लोकप्रियता मिळाली. केवळ, ‘केजीएफ 2’च नव्हे तर, त्याचा प्रीक्वेल ‘केजीएफ’नेही बॉक्स ऑफिसवर चांगलाच दबदबा निर्माण केला होता. ‘केजीएफ 2’ने थेट ‘बाहुबली’ला मागे सारत पहिल्याच दिवशी सर्वाधिक गल्ला जमवणाऱ्या चित्रपटाचा मान मिळवला होता.
मेकर्सच नाही तर, वितरकही मालामाल!
‘केजीएफ 2’ या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर तब्बल 1200 कोटींचा गल्ला जमवला होता. यातून मेकर्सना देखील भरपूर फायदा झाला होता. मात्र, आता चित्रपटाच्या वितरकांना देखील 535 कोटींचा फायदा झाल्याचे समोर आले आहे. कोईमोईच्या वृत्तानुसार जगभरातील वितरकांना जवळपास 535 कोटींचा नफा मिळाला आहे. ‘केजीएफ 2’ या चित्रपटाचे मेकिंग बजेट अवघे 100 कोटींचे होते. त्यातुलनेत या चित्रपटाने वितरकांना तब्बल पाचपट नफा मिळवून दिला आहे.
‘केजीएफ 3’ येणार प्रेक्षकांच्या भेटीस!
दिग्दर्शक प्रशांत नील यांनी यशच्या ‘केजीएफ चॅप्टर-2’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अभिनेता यशशिवाय यामध्ये संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांनी काम केले आहे. हा चित्रपट कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत रिलीज झाला आहे. केजीएफ चॅप्टर-2 हा 2018 च्या केजीएफचा सिक्वेल आहे. आता लवकरच केजीएफ चॅप्टर 3 हा देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू होणार असून, हा चित्रपट 2024 मध्ये रिलीज होईल. दिग्दर्शक प्रशांत नील सध्या सालारच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचे 30 ते 35 टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे. मात्र, यशचे चाहते केजीएफ-3ची आतुरतेने वाट बघत आहेत.
संबंधित बातम्या