KGF 3 Update : यशच्या ‘केजीएफ 3’चं शूटिंग कधी सुरु होणार? चित्रपटाच्या निर्मात्यांनी केलं मोठं वक्तव्य!
KGF 3 : 'KGF 3' चे शूटिंग ऑक्टोबरच्या आसपास सुरू होईल आणि हा चित्रपट 2024 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल, असे म्हटले जात होते.
![KGF 3 Update : यशच्या ‘केजीएफ 3’चं शूटिंग कधी सुरु होणार? चित्रपटाच्या निर्मात्यांनी केलं मोठं वक्तव्य! KGF 3 Makers Karthik Gowda talks about KGF 3 shooting update KGF 3 Update : यशच्या ‘केजीएफ 3’चं शूटिंग कधी सुरु होणार? चित्रपटाच्या निर्मात्यांनी केलं मोठं वक्तव्य!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/16/86ab6a1215bcd012ba8d9f109d5d638f_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
KGF 3 Update : बॉक्स ऑफिसवर तब्बल एक महिना पूर्ण झाला असला तरी, रॉकिंग यशचा ‘केजीएफ 2’ (KGF 2) हा चित्रपट अजूनही धुमाकूळ घालतोय. KGF: Chapter 2साठीची प्रेक्षकांची क्रेझ पाहून निर्मात्यांनी नुकताच तिचा तिसरा भाग जाहीर केला होता. चित्रपट निर्माते विजय यांनी सांगितले होते की, 'KGF 3' चे शूटिंग ऑक्टोबरच्या आसपास सुरू होईल आणि हा चित्रपट 2024 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल.
पण विजयच्या घोषणेच्या एका दिवसानंतर, KGF चे कार्यकारी निर्माता कार्तिक गोडा यांनी यू-टर्न घेतला आहे. प्रोडक्शनच्या वतीने एक निवेदन जारी करत कार्तिकने 3 भागाच्या शूटिंगबाबत मोठा खुलासा केला आहे.
यशने दिली होती कबुली
‘KGF: Chapter 3' वर काम सुरू झाल्याचा अंदाज बर्याच दिवसांपासून लावला जात होता. या शिवाय कन्नड सुपरस्टार यशने दिग्दर्शक प्रशांत नील यांच्याशी चित्रपटातील काही दृश्यांवर चर्चा केल्याचे सांगितल्याने या अटकळांना पूर्णविराम मिळाला होता. निर्माते विजय किरागांडूर यांनी त्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी एक टाइमलाइन दिली आणि सांगितले की, त्यांना या वर्षाच्या शेवटी शूटिंग सुरू होईल अशी आशा आहे.
शुक्रवारी विजयने एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, दिग्दर्शक प्रशांत नील सध्या सालारमध्ये व्यस्त आहेत. जवळपास 30-35 टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे. पुढील शेड्यूल पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. आम्हाला आशा आहे की, ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत शूटिंग पूर्ण होईल. त्यामुळे या वर्षी ऑक्टोबरनंतर केजीएफच्या शूटिंगला सुरूवात करण्याची आमची योजना आहे. आम्हाला आशा आहे की, हा चित्रपट 2024 पर्यंत रिलीज होईल.
आता कार्तिकाने यू-टर्न मारला
मात्र, आता कार्तिक गोडा यांनी यू टर्न घेतला आहे. यांनी ट्विट करत सागितले की, ‘KGF: Chapter 3 बद्दल चालू असलेल्या बातम्या ही केवळ कल्पना आहे. सध्या प्रॉडक्शन हाऊसकडे इतर अनेक रोमांचक प्रकल्प आहेत, आणि म्हणून आम्ही सध्या KGF च्या तिसऱ्या भागावर काम करत नाही आहोत. आता या चित्रपटावर काम सुरू केल्यावर आम्ही तुम्हाला नक्कीच कळवू.
हेही वाचा :
- Irsal : बहुचर्चित 'इर्सल' चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार चित्रपट रिलीज!
- Dharmaveer : 'धर्मवीर'ची भुरळ मुख्यमंत्र्यांनाही; सिनेमा पाहायला उद्धव ठाकरे अन् रश्मी ठाकरे थेट सिनेमागृहात
- Dharmaveer : एका धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा! 'धर्मवीर'ने पहिल्याच दिवशी केली तब्बल 2.5 कोटींची कमाई
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)