एक्स्प्लोर

KGF 3 : ‘केजीएफ 2’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, आता ‘केजीएफ 3’मधून प्रेक्षकांना सरप्राईज देणार यश!

KGF 3 : KGF चा पहिला पार्ट 2018मध्ये रिलीज झाला होता आणि त्यानंतर आता चित्रपटाचा दुसरा चॅप्टर 2022 मध्ये रिलीज झाला आहे.

KGF 3 : रॉकिंग स्टार यशचा चित्रपट 'KGF Chapter 2' थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटाबाबत सोशल मीडियावर ट्रेंड पाहायला मिळत असून, प्रेक्षक या चित्रपटाचे भरभरून कौतुक करताना दिसत आहेत. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा चाहत्यांना आवडत असून, प्रेक्षक सोशल मीडियावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. दरम्यान, चाहत्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. यश सोबत, संजय दत्त, रवीना टंडन, प्रकाश राज आणि श्रीनिधी शेट्टी स्टारर KGF Chapter 2 चा पुढचा भाग KGF Chapter 3 देखील रिलीज होणार आहे. 

KGF चा पहिला पार्ट 2018मध्ये रिलीज झाला होता आणि त्यानंतर आता चित्रपटाचा दुसरा चॅप्टर 2022 मध्ये रिलीज झाला आहे. अशा परिस्थितीत नुकतेच हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना प्रशांत नील यांना याच्या सीक्वेन्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावर त्यांनी सांगितले की, ‘याबद्दल काही बोलणे घाईचे ठरेल. पण जर लोकांना KGF: Chapter 2 आवडत असेल, तर आम्ही फ्रेंचायझी सुरू ठेवण्याचा विचार करू शकतो.’

‘केजीएफ 3’मध्ये दिसणार ‘ही’ गोष्ट

KGF दिग्दर्शक प्रशांत नील यांनी चित्रपटाच्या तिसर्‍या भागाबद्दल हिंट दिली, तर दुसरीकडे सोशल मीडियावर चित्रपटाविषयी अनेक पोस्ट्स पाहायला मिळत आहेत. या चित्रपटाचा तिसरा भागही प्रदर्शित होणार असल्याचा दावा सोशल मीडिया वापरकर्त्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'KGF Chapter 3' मध्ये अमेरिका-इंडोनेशियासह 16 देशांमध्ये झालेल्या गुन्ह्यांची कहाणी दाखवण्यात येणार आहे.

KGF Chapter 2 HD मध्ये लीक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, KGF Chapter 2 ऑनलाइन लीक झाला आहे. हा चित्रपट एचडीमध्ये लीक झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही बातमी समोर आल्यापासून चित्रपटाच्या कलेक्शनवर याचा मोठा परिणाम होईल, अशी अटकळ बांधली जात आहे. नुकतेच चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील यांनी सोशल मीडियावर चित्रपटाबद्दल ट्विट केले होते. प्रशांतने आपल्या ट्विटमध्ये ‘पायरसीला नाही म्हणा’ असे लिहिले आहे.

KGF Chapter 2 च्या स्टारकास्टमध्ये कन्नड स्टार यश तसेच संजय दत्त, श्रीनिधी शेट्टी, रवीना टंडन, प्रकाश राज आणि मालविका अविनाश यांचा समावेश आहे.

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

OTT Free webseries: प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
प्राइम व्हिडीओवर मोफत उपलब्ध 'या' 7 वेब सीरिज चुकवू नका; क्राइम, कॉमेडी, रोमान्स सगळंच आहे!
Cocktail 2 OTT Release: थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?
थिएटरनंतर आता OTT वर धुमाकूळ! शाहिद कपूर-कृती सेननचा 'कॉकटेल 2' कधी आणि कुठे रिलीज होणार?
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
4000 कोटींच्या रामायणात विश्वामित्र साकारणार हा दिग्गज मराठी अभिनेता; लूकवरून होणाऱ्या ट्रोलिंगवर स्पष्टच म्हणाले..
Dilip Joshi on Marathi Actors: 'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम
'जेठालाल'कडून प्रशांत दामलेंचं कौतुक; दिलीप प्रभावळकरांबद्दल म्हणाले...दिलीप जोशींचं मराठी प्रेम

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
South Zone Squad for Duleep Trophy : मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
मोठी बातमी! झिम्बाब्वे दौऱ्यानंतर तिलक वर्माकडे कर्णधारपद, तर त्रिशतक ठोकणाऱ्या वाघाचे संघात पुनरागमन, 15 खेळाडूंचा खतरनाक Full Squad
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Rajat Patidar News : RCB ला चॅम्पियन बनवल्यावर पाटीदारचा नवा धमाका! आता 'या' बलाढ्य संघाची कमान हातात, तर रिंकू सिंगकडे उपकर्णधारपद
RCB ला चॅम्पियन बनवल्यावर पाटीदारचा नवा धमाका! आता 'या' बलाढ्य संघाची कमान हातात, तर रिंकू सिंगकडे उपकर्णधारपद
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Embed widget