Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैय्या-2 नं 100 कोटी क्रॉस केल्यानंतर पहिल्यांदा काय केलं?'; चाहत्यांच्या प्रश्नाला कार्तिकनं दिलं उत्तर
आता कार्तिकला (kartik Aaryan) अनेकांनी सोशल मीडियावर वेगवेगळे प्रश्न विचारले. या प्रश्नांना कार्तिकनं उत्तरं दिली आहेत.
Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यनच्या (kartik Aaryan) भूल भुलैय्या-2 (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटानं 150 कोटींचा टप्पा पार केला आहे. या हॉरर फिल्मनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता कार्तिकला अनेकांनी सोशल मीडियावर वेगवेगळे प्रश्न विचारले. या प्रश्नांना कार्तिकनं उत्तरं दिली आहेत.
आस्क मी एनीथिंग या सेशनमध्ये कार्तिकला एका नेटकऱ्यानं कार्तिकला प्रश्न विचारला, '150 कोटींमधले तुला किती प्रॉफिट मिळाले? ' या प्रश्नाला कार्तिकनं उत्तर दिलं, '150 कोटींमध्ये प्रॉफिट नाही तर चाहत्यांचे प्रेम मिळाले आहे.'
150 cr mein profit nahi
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) June 7, 2022
Fans ka pyaar mila hai !!
Koi number usse bada nahin hota ❤️#AskKartik https://t.co/FDge180zsK
'भूल भुलैय्याला मिळालेल्या यशानंतर कसे वाटले?' असा प्रश्न एका युझरनं कार्तिकला विचारला. या प्रश्नाला उत्तर देत कार्तिक म्हणाला, 'मला प्रिंस सारखे वाटत आहे'. पुढे कार्तिकच्या एका चाहत्यानं त्याला प्रश्न विचारला की, 'भूल भुलैय्या-2 नं 100 कोटी क्रॉस केल्यानंतर पहिल्यांदा काय केलं?' यावर कार्तिक म्हणाला, 'सर्वांत पहिल्यांदा मी मंदिरात गेलो होते.'
Mandir Gaya tha ❤️#AskKartik https://t.co/pkyZMuULOG
— Kartik Aaryan (@TheAaryanKartik) June 7, 2022
कार्तिकचे आगामी चित्रपट
'सोनू के टीटू की स्वीटी', 'प्यार का पंचनामा 2', 'भूल भुलैया 2', 'पति पत्नी और वो' आणि 'धमाका' या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्याचे काही आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'सत्यनारायण की कथा' आणि 'कॅप्टन इंडिया' हे कार्तिकचे आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे.चित्रपटानं पहिल्याचं दिवशी म्हणजेच शुक्रवारी 14.11 कोटींची कमाई केली होती.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
हेही वाचा :