एक्स्प्लोर
अभिनेत्यांच्या दमदार अभिनयाने सजलेला 'द गाझी अटॅक'चा ट्रेलर रिलीज
मुंबई: चित्रपट निर्माता करन जौहरचा आगामी सिनेमा 'द गाझी अटॅक'चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमामध्ये समुद्रातील युद्धाचा थरार दाखवण्यात आला असून, अशा प्रकारच्या संकल्पनेवर अधारित हा भारताचा पहिला सिनेमा आहे. संकल्प रेड्डी यांनी याचे दिग्दर्शन केले असून, हा सिनेमात पाकिस्तानची 'पीएनएस गाझी' ही पाणबुडी बुडण्य़ा मागच्या रहस्याचे गुढ आकलण्यावर आधारित याची कथा आहे.
विशेष म्हणजे, या सिनेमाचा काही भाग संकल्प रेड्डी यांच्या 'ब्लू फिश' या पुस्तकातून घेण्यात आला आहे. यामध्ये अभिनेता दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबाती नौदल अधिकारीची भूमिका साकारत आहे, तसेच अभिनेत्री तापसी पन्नू एक बंगाली शरणार्थीच्या भूमिकेत आहे.
सिनेमात तापसी पन्नू आणि राणा दग्गुबाती यांच्यासह के.के.मेनन, ज्येष्ठ अभिनेते ओमपूरी आणि अतुल कुलकर्णी आदींनी प्रमुख भूमिका साकरली आहे. हा सिनेमा 17 फेब्रुवारी 2017 रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement