Kapil Sharma : कॉमेडियन कपिल शर्माचे अभिनेता होण्याचे स्वप्न लवकरच होणार पूर्ण
Kapil Sharma : विनोदवीर कपिल शर्माचे आगामी सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
Kapil Sharma : कॉमेडियन कपिल शर्माचे (Kapil Sharma) अभिनेता होण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. अलीकडेच कपिल शर्माच्या आगामी सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन नंदिता दास करत आहेत. या सिनेमाचे शूटिंगदेखील सुरू झाले आहे. अशातच त्याचा आणखी एक सिनेमा पाईपलाईनमध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कॉमेडी शो, नेटफ्लिक्स प्रोजेक्ट आणि आता बॅक टू बॅक सिनेमांमुळे कपिल शर्मा चर्चेत आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या माहितीनुसार, कपिल शर्माचे बिग बजेट प्रोजेक्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सिने निर्माते विपुल डी. शाह यांच्या आगामी प्रोजेक्टमध्येदेखील कपिल शर्मा असू शकतो, असे म्हटले जात आहे.
View this post on Instagram
विपुल डी. शाह यांचा आगामी प्रोजेक्ट कॉमेडीवर आधारित असणार आहे. या सिनेमासंदर्भात निर्मात्यांनी किंवा कपिल शर्माने अधिकृत घोषणा केलेली नाही. पण लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो. विपुल डी. शाह सध्या अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी आणि यामी गौतमसोबत 'ओ माय गॉड 2' या सिनेमावर काम करत आहेत.
संबंधित बातम्या
Pathaan : किंग इज बॅक, 'पठाण'च्या शूटिंगसाठी शाहरुख खान स्पेनला रवाना
Aai Kuthe Kay Karte : आशुतोषचा अपमान करणाऱ्या अभिला अरुंधती दाखवणार इंगा, मालिकेत येणार नवं वळण!
Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धामुळे थांबले उर्वशी रौतेलाच्या चित्रपटाचे शूटिंग
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha