एक्स्प्लोर

जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री

देशाचे रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याहस्ते पिंपरी चिंचवडमध्ये बजाजच्या फ्रीडम या जगातील पहिल्या सीएनजी बाईकचा लाँचिंग सोहळा दिमाखात पार पडला.

पुणे : वाढत्या पेट्रोल आणि डिझेलपासून सुटका व्हावी म्हणून ग्राहकांनी आपला मोर्चा ईव्ही वाहनांकडे वळवला आहे. ईलेक्ट्रीक (EV) वाहनांना ग्राहकांची पसंती मिळत असून चारचाकी गाड्यांसह दुचाकी वाहनांच्याही विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 2 वर्षा ईव्ही बाईकधारकांची संख्या वाढल्याने या बाईकची चर्चा होत असते. त्यातच, आता बजाज ऑटो (Bajaj) कंपनीने ग्राहकांना सुखद धक्का दिला आहे. कारण, आजपर्यंत केवळ चार चाकी वाहनांमध्ये असलेला सीएनजी (CNG) पॅटर्न आता दुचाकी वाहनांतही उतरवला आहे. बजाज कंपनीने जगातील पहिली दुचाकी बाजारात उतरवली आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातील मराठमोळ्या ग्राहकांनाही आजपासूनच या दुचाकीची खरेदी करता येईल. 

देशाचे रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याहस्ते पिंपरी चिंचवडमध्ये बजाजच्या फ्रीडम या जगातील पहिल्या सीएनजी बाईकचा लाँचिंग सोहळा दिमाखात पार पडला. या सोहळ्यात भाषण करताना नितीन गडकरी यांनी बजाज कंपनीकडून बाईकच्या किंमतीबाबतची अपेक्षा बोलून दाखवली होती. 1 लाख रुपयांच्या आत या बाईकची किंमत असावी, असे गडकरी यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे बजाज कंपनीनेही मंत्री महोदयांच्या शब्दाचा मान राखत त्यांनी अपेक्षित केलेल्या किंमतीप्रमाणेच या सीएनजी बाईकची किंमत ठेवली आहे. त्यानुसार, 95 हजार ते 1 लाख 10 हजार रुपयांना तीन वेगवेगळ्या मॉडेलमध्ये ही सीएनजी बाईक ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. 

2 किलो सीएनजीमध्ये 230 किमी अॅव्हरेज

बजाज कंपनीने या पहिल्या-वहिल्या सीएनजी बाईकची निर्मिती केली असून आपल्या महाराष्ट्रातच याचा लाँचिंग सोहळा संपन्न झाला. सीएनजी प्लस पेट्रोल अशी ही हायब्रीड बाईक आहे. दोन किलो सीएनजी आणि दोन लिटर पेट्रोलवर ही बाईक 330 किलोमीटरचं अंतर कापते. तर, 2 किलो सीएनजीच्या टाकीमध्ये ती 230 किमीचा टप्पा गाठते. त्यामुळे, सीएनजी आणि पेट्रोल या दोन्हीचा वापर करुन ग्राहकांना या बाईकची परवडणारी सफर करता येणार आहे. 

3 मॉडेल, परवडणारी किंमत

विविध रंगांच्या तीन मॉडेलमध्ये असलेल्या या बाईकची किंमत 95 हजार ते 1 लाख 10 हजार इतकी किंमत आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात आजपासून ही बाईक विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे, सीएनजी बाईकची खरेदी करण्यासाठी उत्सुक असलेल्या ग्राहकांना आता लवकरच सीएनजी बाईकधारक होता येईल. 

राजीव बजाज यांना गडकरींकडून अपेक्षा

या बाईकच्या लाँचिंगप्रसंगी बोलताना राजीव बजाज म्हणाले की, सीएनजी बाईक ही "बजाजची गॅरंटी" आहे, असं आम्ही म्हणू शकतो. आता तुम्हीही तुमच्या भाषणात 'नितीन गडकरींची गॅरंटी' असा उल्लेख कराल, अशी अपेक्षा आहे, असे म्हणत राजीव बजाज यांनी केंद्रीयमंत्री महोदयांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. सीएनजी पंपांची देशभरात कमतरता आहे, या सीएनजी पपांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी. या अनुषंगाने राजीव बजाज यांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे, बजाजकडून सीएनजी बाईकची गॅरंटी देण्यात आली असली तरी, सीएनजी पंपांची संख्या लक्षात घेता, वाहनधारकांना जास्तीत-जास्त सीएनजी पेट्रोल पंपांची गरज भासणार आहे.

हेही वाचा

जगातील पहिली CNG बाईक पुण्यात, नितीन गडकरींच्या हस्ते लाँचिंग; किंमतीबाबत काय म्हणाले केंद्रीयमंत्री

''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
Embed widget