एक्स्प्लोर

Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी

Team India at Vidhan Bhavan : विधानभवनात विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली.

मुंबई : राज्याच्या विधानभवनात (Vidhan Bhavan) आज जगजेत्त्या भारतीय क्रिकेट संघातील (T20 World Cup 2024 Winning Team India) मुंबईकर खेळाडूंचा सत्कार पार पडला. विधान भवनात पहिल्यांदा असा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची जोरदार फटकेबाजी पाहायला मिळाली.

विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी

सत्कार सोहळ्यातील भाषणात फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या उल्लेख महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख वॉईस कॅप्टन अजित पवार (Ajit Pawar) असा केला. यासोबत फडणवीसांनी टीम इंडियाच्या नावाने जोरदार जयघोष केला.

कॅप्टन एकनाथ शिंदे, वॉईस कॅप्टन अजित पवार

देवेंद्र फडणवीसांनी भाषणाची सुरुवात करताना म्हटलं की, आपल्या महाराष्ट्र सरकारचे कॅप्टन एकनाथ शिंदे, सभागृहातील आपले अंपायर राहुल नार्वेकर, वाईस कॅप्टन अजित पवार, थर्ड अंपायर नाही म्हणता येणार त्यांना अंपायरच म्हणावं लागेल, अंपायर नीलम गोऱ्हे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेजींना काय म्हणायचं? अशी फडणवीसांनी फटकेबाजी करताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

काय म्हणाले फडणवीस?

कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वालचं खूप खूप कौतुक. आपल्या सर्वांसाठी अतिशय आज आनंदाचा क्षण आहे. ज्या अपराजित टीमने टी-20 वर्ल्ड कप जिंकला, त्या संघाच्या कर्णधारासह चार खेळाडूंचा सत्कार करण्याची संधी आपल्याला मिळाली. कर्णधार रोहित शर्माने एकाच दिवशी आनंद आणि दु:खही दिलं. वर्ल्ड कपची ट्रॉफी जिंकून आनंद आणि निवृत्ती घेऊन दु:ख दिलं, असं फडणवीसांनी यावेळी म्हटलं. 

जगजेत्त्या भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचा विधानभवनात सत्कार

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Team India : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार; कर्णधार रोहित शर्मासह सूर्या, शिवम आणि यशस्वीचा गौरव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Vijay Wadettiwar : इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | एबीपी माझा 05 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Mumbai Rain Update | मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे हाल, नालेसफाईवरून राजकारण!IndraJeet Sawant on Waghnakh | लंडनहून येणारी वाघनखं शिवरायांची नाहीत? सावंतांचा सवालNashik Railway | मुंबईत मुसळधार! पावसाचा नाशिक रेल्वे प्रवाशांना फटका; ट्रेन तासभर उशिराने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Vijay Wadettiwar : इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
Pangong Lake in eastern Ladakh : लडाखजवळ चिनी सैन्याने गोळा केली शस्त्रास्त्रे; सॅटेलाईट फोटोंवरून उघड, बंकर सुद्धा बांधले
लडाखजवळ चिनी सैन्याने गोळा केली शस्त्रास्त्रे; सॅटेलाईट फोटोंवरून उघड, बंकर सुद्धा बांधले
कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी
कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी
विधान परिषद निवडणुकीत एमआयएम कोणाच्या बाजूने, मविआ की महायुती? आमदार फारुख शाहांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
विधान परिषद निवडणुकीत एमआयएम कोणाच्या बाजूने, मविआ की महायुती? आमदार फारुख शाहांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...
राजकारण करण्याची वेळ नाही, लोकांना मदत करणं गरजेचं, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स सज्ज, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा 
राजकारण करण्याची वेळ नाही, लोकांना मदत करणं गरजेचं, आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स सज्ज, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा 
Embed widget